24.9 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home Featured News पावसामुळे सवाई गंधर्व महोत्सव स्थगित

पावसामुळे सवाई गंधर्व महोत्सव स्थगित

0
27

पुणे–अवकाळी पावसामुळे पुण्यात सुरू असलेला सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव तूर्त स्थगित करण्यात आला असून, जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये हा महोत्सव घेण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले आहे. कलाकारांच्या सोयीनुसार पुढील तारखा जाहीर केल्या जातील, असेही सांगण्यात आले आहे.
पुण्यातील रमणबाग प्रशालेच्या मैदानावर गुरुवारपासून सवाई गंधर्व महोत्सवाला सुरुवात झाली. नियोजित कार्यक्रमानुसार रविवारपर्यंत विविध कलाकार या महोत्सवात आपली कला सादर करणार होते. मात्र, शुक्रवारी दुपारी पुण्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. त्याचबरोबर इतरही व्यवस्था अडचणीत आल्यामुळे महोत्सव तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पावसामुळे शुक्रवारचे सत्र सुरुवातीला पाच वाजेपर्यंत पुढे ढकलण्यात आले होते. पण त्यानंतरही व्यवस्था पूर्ववत होणे शक्य नसल्यामुळे महोत्सव स्थगित करण्यात आला.