राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ७ ऑगस्टला महाअधिवेशन नागपुरात

0
22
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया,दि.5-विदर्भातील सर्व ओबीसी संघटनांनी मिळून तयार केलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने येत्या ७ ऑगस्ट रोजी नागपुरातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात एक दिवसीय ओबीसी महाधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.अधिवेशन चार सत्रामध्ये आयोजित करण्यात आले आहे.
या महाधिवेशनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांच्या हस्ते होणार आहे.स्वागताध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक प्राचार्य बबनराव तायवाडे राहणार असून महाधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी प्रा.या.वा.वडस्कर राहणार आहेत.प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर,नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,माजी राज्यमंत्री व विधानसभेचे गटनेते आमदार विजय वड्डेटीवार,खासदार रामदास तडस,खासदार नाना पटोले,खासदार राजीव सातव,आमदार सुनील केदार,आमदार रवी राणा,माजी आमदार पांडुरंग ढोले,सेवक वाघाये उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.यावेळी बहुजन ओबीसी चळवळीत आपले योगदान देणारे बहुजन संघर्षचे नागेश चौधरी,माजी मंत्री सुधाकर गणगणे,प्रा.मा.म.देशमुख व बबनराव फंड यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
सकाळी ११.३० वाजता आयोजित ओबीसी शिष्यवृत्ती व नॉनक्रिमिलेयर समस्या आणि एकविसाव्या शतकातील ओबीसी युवकासमोरील आव्हाने या विषयावरील चर्चासत्रात ओबीसी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर,यशदाचे राष्ट्रीय प्रशिक्षक अ‍ॅड.गणेश हलकारे हे प्रमुख वक्ते असून प्रा.जेमिनी कडू अध्यक्षस्थानी राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ.आर.जी.टाले, महात्मा फुले समता परिषदेचे विदर्भ संघटक प्रा.दिवाकर गमे,सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष प्रा.अशोक चोपडे,प्रा.अरुण पवार,दिनेश चोखारे,नितीन मते,रविकांत बोपचे,सलिल देशमुख,डॉ.राजेश ठाकरे,भूषण दडवे उपस्थित राहणार आहेत.
दुपारी २.३० वाजता आयोजित ओबीसी शेतकèयांची समस्या व उपाय या विषयावरील द्वितीय सत्रात प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेडे,कृषीतज्ञ अमिताभ पावडे मार्गदर्शन करणार तर गोंदिया ओबीसी कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे हे अध्यक्षस्थानी राहतील.यावेळी अरुण पाटील मुनघाटे,रमेश मडावी,बबनराव नाखले,अविनाश काकडे,प्रा.देवानंद कामडी पाहुणे म्हणून उपस्थित राहणार .सायंकाळी ४.३० वाजेच्या तृतीय सत्रामध्ये ओबीसी महिला व सामाजिक परिवर्तन या विषयावर बीडच्या सुशीलाताई मोराळे,नागपूरच्या नंदाताई फुकट मार्गदर्शन करतील तर अध्यक्षस्थानी प्रा.नुतनताई माळवी राहतील.प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य विद्याताई तट्टे,शुभांगी घाटोळे,यामिनी चौधरी,अ‍ॅड.रेखा बारहाते उपस्थित राहणार आहेत.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एम्प्लाईज असो.चेन्नर्इे महासचिव जी.करुणानिधी राहणार असून वक्ते म्हणून बहुजन संघर्षचे संपादक नागेश चौधरी,राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचे संयोजक नितीन चौधरी मार्गदर्शन करतील.अतिथी म्हणून राज्याचे पशुसंवर्धन ,दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री ना.महादेवराव जानकर,आमदार जितेंद्र आव्हाड,आमदार बच्चू कडू,आमदार विजय रहागंडाले,आमदार बाळू धानोरकर,एस.एल.अक्किसागर,जयतंराव लुटे,प्रा.रमेश पिसे,परिणय फुके उपस्थित राहणार आहेत.या महाधिवेशनाच्या यशस्वितेसाठी विदर्भातील सर्व ओबीसी संघटना,जात संघटनांचे पदाधिकारी परिश्रम घेत असून ओबीसी बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे,कार्याध्यक्ष अमर वराडे,उपाध्यक्ष मनोज मेंढे,संघटक कैलाश भेलावे,आशिष नागपूरे,प्रा.रामलाल गहाणे, सावन कटरे, विनायक येडेवार,प्रा. बी.एम. करमकर,प्रा. संज़ीव रहांगडाले, विष्णू नागरीकर,संजय टेंभरे, शिशिर कटरे, उमेंद्र भेलावे, कृष्णा बहेकार, बालू बडवाईक,जितेश राणे, प्रा.राजेंद्र पटले, विवेक मेढे, आनंदराव कृपाण, संतोष वैद्य,सविता बेदरकर, प्रदीप निंबार्ते, मुरलीधर करंडे, मनोज शरणागत,धन्नालाल नागरिकर, राजेश चांदेवार,भरत शरणागत,डॉ.संजय देशमुख,रेखलाल टेंभरे,राजेश नागरीकर,गणेश बरडे,माधव फुंडे,लिलाधर गिèहेपुंजे,दिनेश हुकरे,विलास चव्हाण,धनेंद्र चव्हाण,दामोदर नेवारे,अनिल कोरे,दिलीप चव्हाण,भुपेश गौतम,कमलेश बारेवार,सावन डोये,चंद्रकुमार बहेकार,राजेश मुनीश्वर,राधाकिसन चुटे,सुरेश येळे याच्ङ्मासह विदर्भातील सर्व ओबीसी संघटना,जात संघटनांचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.