संभ्रम चित्रपटात आपले वडील निर्दोष आहेत हे कळाल्यावर जयंत त्यांना तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी पुरावांचा शोध घेऊ लागतो तर दुसरीकडे चोरीचा मामला चित्रपटात एका वाघीणीचे अपहरण होते तेव्हा तिचा आईसारखा सांभाळ करणारी एक स्त्री एका एजन्सीची मदत घेते. जयंतचे वडील तुरुंगातून सुटतील की नाही आणि वाघीण सापडते की नाही हे त्या त्या चित्रपटात रंजकपणे कळणार आहे.
“भाषेचे सर्व अडथळे तोडून दोन वेगळ्या संस्कृतींचे चित्रपट मराठी भाषेत प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून देताना अत्यंत आनंद होत आहे. रसिक प्रेक्षकांना दोन्ही चित्रपट नक्कीच आवडतील अशी आशा आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.