नो हेल्मेट, तरीही पेट्रोल…सरकारने निर्णय घेतला मागे

0
10

वृत्तसंस्था
मुंबई,दि.5 – सामान्यांनी आणि पेट्रोल पंप चालकांनी नाराजी दर्शवल्यानंतर सराकराने आपला नो हेल्मेट, नो पेट्रोल हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यासंबंधी विधानसभेत माहिती दिली. निर्णय मागे घेण्यात आाला असला तरी ज्यांनी हेल्मेट घातले नाही अशा गाड्यांचे नंबर पेट्रोलपंप चालकांनी आरटीओ अधिकाऱ्यांना कळवायचे आहेत. त्या माहितीच्या आधारे परिवहन विभागाकडून कारवाई करण्यात येईल असंही दिवाकर रावतेंनी सांगितलं आहे.

परिवहन मंत्री दिवाकर रावतेंच्या हेल्मेट न घालणा-या दुचाकीस्वारांना पेट्रोल पंपावर इंधन न देण्याच्या आदेशावर विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली होती. या आदेशाला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जोरदार विरोध करून हा निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलं होतं. त्याच्या उत्तरदाखल मुख्यमंत्री फडणवीस यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावतेंना या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला होता. मुख्यमंत्र्यांच्या दबावानंतर हा निर्णय अखेर मागे घेण्यात आला.