
गोंदिया,दि.०५ः ७ फेब्रुवारी २०२६ रोजी माता रमाई यांची जयंती देशभरात साजरी करण्यात येते. या निमित्ताने, ‘रमाई’ हिंदी चित्रपटाचे पोस्टरचे विमोचन एम.जी.पॅरामेडिकल कॉलेजचे संचालक अनिल गोंडाणे यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी गोंदियाचे स्थानिक कलाकारांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथे चित्रपट प्रदर्शित करून गोंदिया शहराचा गौरव वाढवून माता रमाईला मान वंदना अर्पित केली आहे. या कार्यक्रमात, चित्रपटात तरुणी रमाईची भूमिका साकारणारी गोंदिया येथील अभिनेत्री क्विनल मुनेश्वर, तिची बहीण गौरा साकारणारी स्नेहा मुनेश्वर, आणि चित्रपटाचे दिग्दर्शक-लेखक कबीर दा, मुख्य सहाय्यक दिग्दर्शक सार्थक बोरकर, गोंदिया प्रतिनिधी चित्रपट अमित मेश्राम आणि उमेश मुनेश्वर यांचा एम.जी.पैरामेडीकल कॉलेजतर्फे पुष्पगुच्छ देवून सन्मान व सत्कार करण्यात आला.या प्रसंगी एम.जी.पैरामेडीकल कॉलेजचे संचालक आणी संस्थापकअनिल गोंडाने, भूतपूर्व नगरसेविका श्रीमती मनसरबाई गोंडाने, प्राचार्या अनुसया लिल्हारे, प्रा. रामेश्वरी पटले, प्रा. छाया राणा, प्रा. आरती चौधरी, प्रा. प्रिती वैद्य, प्रा. प्रज्ञा गांवडे, प्रा. मनिष चौधरी, प्रा. सौरभ बघेले, प्रा. आकाश श्रोते,राजु रहांगडाले,राजाभाऊ उंदिरवाडे, सौ. मयुरी बघेले, श्रीमती योगेश्वरी ठवरे, श्रीमती रूपाली धमगाये व सर्व विद्यार्थीगण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. प्रज्ञा गावंडे तर आभार प्रदर्शन प्रा. रामेश्वरी पटले यांनी केले.





