महाराष्ट्र माझा शेतकरी राजा लघु चित्रपट स्पर्धेस ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

0
10

गोंदिया,दि.७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे राज्यातील शेतकऱ्यांची यशोगाथा, कृषी विकास, जलसंधारण या विषयावर महाराष्ट्र माझा शेतकरी राजा लघुचित्रपट स्पर्धा-२०१६ आयोजित करण्यात येत आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव ब्रिजेश सिंह यांनी या स्पर्धेची घोषणा केली आहे. लघुपट सादर करण्यास ३० नोव्हेंबर २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्रथम क्रमांक विजेत्या लघुचित्रपटास ५१ हजार रुपयांचे तर द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे ३१ हजार आणि २१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. लघुचित्रपट स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या लघुचित्रपटांची मालकी ही माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे राहील. लघुचित्रपट हा ३ ते ५ मिनिटे कालावधीचा असावा. चित्रीकरण एचडी (कऊ) गुणवत्तेचे असणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी गेल्या दोन वर्षातील कृषी क्षेत्राचा विकास, शेतकरी बांधवांची बदललेली परिस्थिती, जलयुक्त शिवार अभियान, पीक कर्जाची सहज उपलब्धता, जलसंधारणामुळे शेतीचा विकास, शासकीय योजनांच्या सहकार्याने शेतीत केलेले प्रयोग अशी यशोगाथा सांगणारे लघुचित्रपट तयार करावे. त्यामध्ये शेतकऱ्यांचे मनोगत घ्यावे. यशोगाथा चित्रीकरण करत असतांना संबंधित शेतकऱ्यांचे नाहरकत प्रमाणपत्र स्पर्धकांनी घेणे बंधनकारक राहील.
स्पर्धकांनी हे लघुचित्रपट ३० नोव्हेंबर २०१६ पर्यंत वसळीिपशुी०१ऽसारळश्र.लो या ई-मेलवर पाठवावे. लघुचित्रपटाचे चित्रीकरण हे सद्यस्थितीतील असावे. ते संकलीत करुन यशोगाथा स्वरुपात स्पर्धकांनी सादर करणे आवश्यक आहे. जुने चित्रीकरण असलेले लघुचित्रपट स्पर्धेसाठी पात्र राहणार नाही. स्पर्धकांनी चित्रीकरण कुठे आणि कधी केले याबाबतचे प्रमाणपत्र देखील देणे आवश्यक आहे.
परीक्षकांच्या निवड समितीने निवडलेल्या लघुचित्रपटास पारितोषिक देण्यात येईल. या स्पर्धेचे सर्व हक्क माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे राखून ठेवण्यात आले आहे. स्पर्धक लघुचित्रपटाच्या सीडीज आपल्या जिल्ह्यातील जिल्हा माहिती कार्यालयाकडे देवू शकतात. या संदर्भात अधिक माहितीसाठी सहायक संचालक (माहिती) सागरकुमार कांबळे मो.८६०५३१२५५५ यांच्याशी संपर्क साधावा.