‘एसएमएस’ने मिळेल वीज बिल व खंडित पुरवठय़ाची माहिती

0
12

मोबाईल क्रमांक नोंदविण्याचे आवाहन : गोंदिया परिमंडळात ४७ हजार ११६ नोंदणी

गोंदिया,दि.06 : महावितरण ग्राहकांना आता भंडारा व गोंदियासह महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेले सर्व वीज ग्राहकांना वीज बिलाचे ‘एसएमएस’ पाठविण्यात येत आहे. महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर ही माहिती मिळणार आहे. ग्राहकांनी नोंदणी त्वरित करावी, असे आवाहन महावितरण गोंदिया परिमंडळातर्फे वीज ग्राहकांना करण्यात येत आहे.
आपल्या भागातील रोहित्रास बिघाड झाला असेल किंवा दुरुस्ती कामासाठी वीजपुरवठा खंडित करावयाचा असल्यास त्याबाबतची माहिती ‘एसएमएस’ने महावितरणद्वारे देण्याची सुविधा प्राप्त करण्यासाठी ग्राहकांना महावितरणच्या टोल फ्री क्रमांक १८00२३३३४३५, १८00२00३४ किंवा १९१२ वर फोन करुन नोंदणी करावी लागेल. तसेच ९२२५५९२२५५ या क्रमांकावर एमआरईजी ग्राहक क्रमांक (उदा. एमआरईजी ४५00१0५२१३३२) अशाप्रकारकचा एसएमएस पाठवून नोंदणी करता येईल. सदर एसएमएस पाठविल्यावर एमडी-एमएसईडीसीएल द्वारे आपली नोंदणी झाल्याबाबत नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर नोंदणी झाल्याचा एसएमएस प्राप्त होईल. हा एसएमएस काही वेळा उशिरा प्राप्त होऊ शकतो. परंतु आपली नोंदणी झाली असेल.ग्राहक सुविधांचा लाभ घेण्याकरिता अधिक माहितीसाठी महावितरण संकेतस्थळावर वीज ग्राहकांनी भेट द्यावी. आतापर्यंत वीज सुविधांचा लाभ घेण्यासाठी गोंदिया परिमंडळातील ४७ हजार ११६ वीज ग्राहकांनी स्वत:च्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्रात केली आहे. यात परिमंडळातील घरगुती, वाणिज्यीक तर औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. कृषी ग्राहकाचा उत्तम प्रतिसाद आहे.गोंदिया परिमंडळातील गोंदिया व भंडारा जिल्ह्यात ग्राहकांनी मोठय़ा संख्येने नोंदणी केली आहे.वीज ग्राहकांची संख्या गोंदिया विभागात १३ हजार ५एवढी असून देवरी या नक्षलग्रस्त विभागात ८६00 एवढी आहे.भंडारा मंडळात साकोली व भंडारा विभाग मिळून मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेले वीज ग्राहकांची संख्या २५ हजार ५११ एवढी आहे. याशिवाय महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्र येथून पाठविण्यात येणार्‍या या एसएमएसच्या व्यतिरिक्त ई-मेल सुविधा उपलब्ध आहे. सर्व नोंदणीकृत वीज ग्राहकांना त्यांची वीजबिल त्यांच्या ई-मेलवर पाठविण्यात येत आहेत.महावितरणच्या या सेवेमुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना सर्व माहिती एका क्लिकवर मिळत आहे.ज्या ग्राहकाला नोंदणी करणे शक्य नसेल त्यांनी संबंधित शाखा अथवा उपविभाग कार्यालयाकडे आपला ग्राहक क्रमांक व मोबाईल क्रमांक नोंदवावा.यासोबतच मीटर रिडिंग करणार्‍या व्यक्तीला अथवा वीज बिल वाटणार्‍या व्यक्ती किंवा कर्मचार्‍याकडे वीज ग्राहकांनी आपला मोबाईल क्रमांक उपलब्ध करुन दिल्यास त्याची नोंदणी महावितरणमध्ये करण्यात येणार आहे.