राज्यात पहिले सौर शीतगृह होणार अकोल्यात!

0
21

अकोला, दि.१- भाजीपाला बियाणे साठवणुकीसाठी राज्यातील पहिले आद्र्रता विरहित सौर शीतगृह (कोल्ड स्टोरेज) अकोल्यात होणार आहे. ३६0 कोटी रुपये खचरून बांधण्यात येणार्‍या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) या शीतगृहाला राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ५0 टक्के अनुदान उपलब्ध होईल.

अकोल्यातील औद्योगिक वसाहतीत १0 हजार स्केअर फूट जागेवर हे शीत गोदाम होणार आहे. अनेक वेळा भाजीपाला बियाण्यांची मागणी घटल्यास बियाणे साठवून ठेवण्यात येते. महाबीजकडे एक शीतगृह आहे; परंतु त्या शीतगृहाची साठवण क्षमता र्मयादित असल्याने महाबीजने नवीन गोदामाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. या प्रस्तावाला मान्यता प्राप्त झाल्याने महाबीजने सौर शीतगृहाच्या कामास सुरुवात केली आहे. या कामाचे भूमिपूजन राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी शुक्रवारी केले.