माना जमातीचा राष्ट्रीय वर-वधू परिचय मेळावा

0
122

भद्रावती,दि.01 : येथील माना जमात वधू-वर युवक मंडळातर्फे २८ व २९ जानेवारीला येथील ग्रामीण रुग्णलायाजवळील माणिका देवी मंदिराच्या पटांगणावर आदिवासी माना जमातीच्या राष्ट्रीय उपवर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.दोन दिवस चालणाऱ्या राष्ट्रीय मेळाव्यात दि. २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता महिलांकरिता हळदी-कुंकू, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. तसेच हुंडा न घेणारे जोडपे, नवनिर्वाचित सरपंच, न.प., पं.स. व जि.प. सदस्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. रात्री ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे.

२९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता वधू-वर पचिय मेळाव्याचे उद्घाटन, स्मरणिका प्रकाशन, मान्यवरांचे मार्गदर्शन, कार्यकर्ता गौरव पुरस्कार वितरण, उपवर-वधूंचा परिचय आणि ४ वाजता सामूहिक विवाह सोहळा आदी कार्यक्रम पार पडणार आहे.सदर मेळव्याकरिता बाहेरगावाहून येणाऱ्या जमात बांधवांची भोजनाची आणि निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. जमात बांधवांनी स्मरणिकेकरिता समाज प्रबोधनपर लेख, कविता, कथा, जमातीचा इतिहास याची माहिती, उपवर-वधूंची नावे, शिक्षण, व्यवसाय, जन्म तारीख, उंची, वर्ण, मामेकुळ, पालकांचा पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक अशी माहिती आणि नवनिर्वाचित सरपंच, पं.स., जि.प., न.प. सदस्य यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत आणि फेब्रुवारी/मार्च २०१६ च्या परीक्षेत दहावी किंवा बारावीच्या परिक्षेत ६० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेच्या झेरॉक्स प्रती १५ जानेवारीपर्यंत पोहोचतील, अशा बेताने देवीदास जांभुळे गजानन नगर भद्रावती या पत्त्यावर पाठवावे.अधिक माहितीकरिता जांभुळे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आल्याचे मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख रूपचंद धारणे यांनी प्रसिद्धीपत्रकातून कळविले आहे.