अखिलेश यादव बनले सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष

0
9

लखनऊ, दि. 1 – गेल्या काही दिवसांपासून मुलायम सिंग यादव परिवार आणि समाजवादी पक्षात सुरू असलेल्या यादवीत अखेर अखिलेश यादव यांनी बाजी मारली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला आज सकाळी बोलावण्यात आलेल्या समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात अखिलेश यादव यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबरोबरच समाजवादी पक्षात नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.

अखिलेश आणि रामगोपाल यांचे निलंबन मागे घेण्यात आल्यावर सपामध्ये सारे काही आलबेल झाल्याचे चित्र रंगवण्यात येत होते. मात्र रविवारी नियोजित असलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव यांनी शक्तिप्रदर्शन केले . लखनऊत झालेल्या सपाच्या या राष्ट्रीय अधिवेशनात प्रा. रामगोपाल यादव यांनी अखिलेश यादव यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर उपस्थित प्रतिनिधींनी हात उंचावून या प्रस्तावास अनुमोदन दिले.