निष्पाप 7 जणांचे बळी घेणार्या बिंदल प्लाझा हत्याकांडातील आरोपी अद्यापही फऱार

0
9

गोंदिया पोलीसांच्या तपास कार्यावर प्रश्नचिन्ह
एका आरोपीला जामिन,उर्वरित फरारच
पोलीस व राजकारणात बिंदल हत्यांकांडाचा बळी

गोंदिया,berartimes.com दि.21-गोंदिया शहराच्या मुख्य बाजारपरिसरातील गोरेलाल चौकातील भाजपनेत्याच्या बिंदल प्लाझा या हाॅटेलला आग लागून सात जणांचा मृत्यू झाल्याचा घटनेला आज 21 जानेवारीला पुर्ण एक महिना लोटला.परंतु या हत्याकांडात ज्यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले,त्यापैकी एकालाही पोलीसांना पकडण्यात यश आले नाही.याउलट एकाला जामिन मिळाल्याने पोलीसांच्या तपासकार्यावरच नव्हे तर पुर्ण कार्यप्रणालीवरच शंका निर्माण झाली आहे.हे प्रकरण दाबण्यासाठी राज्याच्याच नव्हे तर केंद्राच्या सत्तेत असलेल्या राजकीय पक्षासोबत गोंदियातील विरोधी पक्षांनी सुध्दा चांगलीच मदत केली हे या सर्वप्रकरणावरुन स्पष्ट झाले आहे.
भाजपचे कर्मठ सदस्य गोंदिया होमियोपॅथी मेडीकल काँलेजचे प्रमुख डाॅ.राध्येशाम (बबली) अग्रवाल यांच्या कुटूबियांची ही हाॅटेल.गोंदियाचे विद्यमान आमदारांचे ते चुलत भाऊ.भाजप आणि काँग्रेसचा ताळमेळ असल्याने हे प्रकरण दाबण्यासाठीच जेवढे प्रयत्न झाले असतील तेवढे दोषींना शिक्षा मिळावी यासाठी झालेच नसावे,यात शंकाच नाही.त्यातही ही हाॅटेल डाॅ.अग्रवाल यांच्याव्यतिरिक्त इतर दुसर्या किंवा तिसर्या व्यक्तिचीही राहिली असती तर आत्ता पर्यंत त्या दोषींना पकडण्यासाठी हाच बाजार परिसरच नव्हे तर काही तथाकथीत पुढार्यांनी बाजार बंदचेही आवाहन करुन टाकले असते,यावरुन जनता असो की व्यापारीवर्ग यांचाही याप्रकरणात बघण्याचा दृष्टीकोन हा अभ्यास करण्यास वाव देणारा ठरला.

हाटेलच्या आगीत सात जणांचा बळी घेतलेल्या या बिंदल प्लाझाची पुन्हा रंगरंगोटी सुरू झाल्याने हॉटेल सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात मोठे अग्नितांडव २१ डिसेंबर 2016 रोजी पहिलेच गोरेलाल चौकातील बिंदल प्लाझामध्ये घडले,ते सुध्दा हाॅटेल व्यवस्थापनाच्या चुकीने हे नगरपरिषद व अग्निशमन विभागानुसार.सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे ही आग वाढल्याचे स्पष्ट झाले आहे,ज्यापध्दतीने इमारतीला आग लागली,त्यावरुन ती ईमारत वापरण्यायोग्य होऊच शकत नाही.परंतु त्या ईमारतीच्या सुरु असलेल्या रंगरगोंटीवरुन असे दिसून येते की ज्या सात निष्पाप लोंकाचा नाहक जीव गेला त्यांच्या बद्दल त्या हाॅटेल मालकालाच नव्हे तर त्यांना साथ देणार्या गोंदियातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना काहीच कसे वाटत नाही,हे कळेनासे झाले आहे.या प्रकरणात सात जणांवर आरोप ठेवण्यात आले असून न्याय़ालयाने डाॅ.बबली अग्रवाल यांना जामीन दिला आहे,तर घटनेतील सहा आरोपींना न्यायालयाने अंतरिम जामीन नाकारल्यामुळे ते अद्यापही फरार आहेत.
या आगीवर अग्निशमन विभागाने शर्थीचे प्रयत्न करीत तब्बल ५ तासानंतर निंयंत्रण मिळविले. हाटेलच्या तळं मांजल्यावर असलेल्या झी महासेलने देखील पेट घेतला तर बाजूला लागून असलेल्या नर्मदा इलेक्ट्रानिकला लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाले.
घटनेतील मृतांच्या कुटुंबियांची भेट घेऊन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी सांत्वन करीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाख रुपये प्रत्येकी तात्पुरती मदतीची घोषणा केली होती. मात्र, अद्याप मृतांच्या कुटुंबियांपर्यंत मदतनिधी पोहोचली नाही. या आगीत हॉटेलचे चार मजले जळून खाक झाले. विशेष म्हणजे महासेल फक्त काही दिवसापुरता असते परंतु हा महासेल गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू असताना कामगार आयुक्त कार्यालय व नगपरिषेदचे दुर्लक्ष झाले होते. ज्या होटलला आग लागली त्या होटलचे सुध्दा वरचे काही बांधकाम अनधिकृत असल्याची बाब नंतर उजेडात आली. त्या बांधकामाला नगरपरिषदेसह इतर कुठल्याही विभागाचे परवानगी नाही. हॉटेल आणि लॉज सुरू करण्याकरिता कसलीही परवानगी घेण्यात आली नसल्याचा निर्वाळा खुद्द पालिका प्रशासनाने दिला.या सर्व प्रकरणाचा विचार करता ज्या सात जणांवर आरोप निश्चित करण्यात आले,त्यासोबत गोंदिया नगरपरिषद व गोंदिया तहसिल,उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयातील काहींवर सुध्दा ठपका ठेवत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवे होते.कारण त्यांनी एवढे दिवस या हाटेलच्या परवान्यापासून इतरबाबीकडे दुर्लक्ष का केले.यापुर्वी पंचायत राज कमिटीपासून शासनाच्या आदिवासी कमिटीचे आमदार सुध्दा या हाटेलमध्ये थांबले होते,त्यावेळी जर ही घटना घडली असती तर प्रशासनाने काय केले असते याचा विचार कुणीच केलेला दिसत नाही.
शार्ट सर्किटमुळे आग लागलेले हॉटेल बिंदल प्लाजा हे भाजपचे जिल्ह्यातील जेष्ठ नेते ,जनता सहकारी बॅकेचे अध्यक्ष डॉ. राधेश्याम (बबली) अग्रवाल यांच्या मालकीचे आहे. हॉटेलचे बांधकाम सुरू असतानाच परवानगीचा विषय नेहमीच चर्चेत राहायचा. आग लागून त्याठिकाणी असलेले सिलिंडरचा स्फोट देखील झाला. त्यामुळे इमारतीला तडे गेले. भविष्यात ही इमारत धोकादायक असल्यामुळे ती इमारत पाडणेच योग्य राहिल, असे एका शासकीय विभागाने म्हटले होते. परंतु, राजकीय दबावाचा वापर करत ही इमारत न पाडता रंगरंगोटी सुरू झाली. येत्या काही दिवसांत येथे पुन्हा व्यापार सुरू होईल. मात्र, भविष्यात इमारत पडून पुन्हा मोठी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण राहतील? याचे उत्तर प्रशासनालाच द्यावे लागणार आहे.
उल्लेखनीय म्हणजे या घटनेला सात जण जबाबदार असल्याचे पोलिस विभागाने नोंदविले आहे. त्यातील मुख्य आरोपी यांना न्यायालयाने अंतरिम जामीन दिला. परंतु, अद्याप सहा जण फरार आहेत. कार्यतत्पर असलेल्या पोलिस विभागाला फरार असलेल्या आरोपींपर्यत पोहोचता कसे येत नाहीत? की जाणून त्या आरोपींना शह दिला जात आहे, अशी शहरात चर्चा सुरू झाली.