27.3 C
Gondiā
Friday, July 10, 2026
Home विदर्भ बिरोली,मुंडीपार घाटावर जेसीबीने वाळू उपसा

बिरोली,मुंडीपार घाटावर जेसीबीने वाळू उपसा

0
55

तिरोडा,दि.21- तिरोडा तालुक्यातून वाहणार्या वैनगंगा नदीपात्रातील वाळूचे उपसा हे अवैधरित्या जेसीबीने केले जात असल्याचा प्रकार तिरोडा तालुका युवा सेनेचे कपिल भोंडेकर यांनी समोर आणला असून तिरोडाचे उपविभागीय अधिकारी व तहसिल प्रशासनांच्या संगनमतानेच हा अवैध उपसा होत असल्याचा आरोप केला आहे.जेव्हापासून उपविभागीय अधिकारी म्हणून सुर्यंवंशी तालुक्यात आले तेव्हापासून वाळुुउपसाचे अवैधप्रमाण वाढले असून जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधी सुध्दा त्यांना पाठिशी घालत असल्याचे म्हटले आहे.सोबतच बिरोली व मुंडीपार येथील वाळूघाटावर सर्रासपणे जेसीबीने वाळूचा उपसा केला जात असताना प्रशासन कधी कारवाई करणार असेही भोंडेकर यानी म्हटले आहे.सोबतच तिरोडा तालुका शिवसेनेला सुध्दा याप्रकरणात समोर येईल का अशा प्रश्न उपस्थित केला आहे.