दोन्ही बालगृहे बंदच्याहालचाली

0
7

अमरावती- तपोवन वसतिगृहात राहणा-या एका मुलीने बारा दिवसांपूर्वी अत्याचाराची तक्रार पोलिसांत दिली. हा तपास सुरू असतानाच २० डिसेंबरला आणखी एका मुलीने पोलिसांत अत्याचाराची तक्रार दिली. अत्याचार करणारे दोन्ही संस्थेचे कर्मचारी निघाले. पोलिसांत झालेल्या या दोन तक्रारींव्यतिरिक्त जवळपास 30 मुलींनी तक्रारपेटीतून आपली व्यथा मांडली. प्रकरणाच्या तपासात पोलिसांना दरदिवशी धक्कादायक माहिती मिळत आहे.

बालगृहात राहणाऱ्या मुलींवरील अत्याचाराची माहिती अधीक्षकांनी मिळाली होती; तरीही त्यांनी प्रकरण दडपून ठेवले. पोलिसांनी चुटे यांनाही अटक केली आहे. तसेच संस्थेचे सचिव गोसावी यांनाही पदावरून बाजूला केले. शाळेतील काही शिक्षकही मुलींना त्रास द्यायचे, असे मुलींनी तक्रारपेटीद्वारे केलेल्या तक्रारीतून पुढे आले आहे. या ठिकाणी सुरू असलेला गोंधळ हा धक्कादायक असल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. बालगृहांत असलेल्या शेकडो मुलींच्या संगोपनाची जबाबदारी ही बालगृह प्रशासनाची आहे. मात्र, पुढे आलेल्या प्रकरणावरून मुलींची काळजी संरक्षण योग्य पद्धतीने होत नसल्याचे दिसत आहे. ही बाब जिल्हा महिला बालविकास अधिकाऱ्यांच्या पाहणीतही पुढे आली आहे. त्यामुळेच जिल्हा महिला बालविकास अधिकाऱ्याने १२ डिसेंबरला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीसवर तपोवन प्रशासनाकडून अजूनही त्यांना उत्तर मिळाल्याने १९६२ सुरू असलेले निराधार निराश्रित बालगृह वरिष्ठ कनिष्ठ अशी दोन्ही बालगृहे का बंद करण्यात येऊ नये, अशी विचारणा केली आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन कळवण्यात येईल, असे सांगण्यात आले; असे जिल्हा महिला बालविकास विभागाच्या सूत्रांनी सांगितले. तूर्तास पत्र दिले आहे. बालगृहे बंद करण्याबाबतचा निर्णय हा स्थानिक पातळीवर होणार नाही. या बाबतचा निर्णय विभागाचे वरिष्ठ अधिकारीच घेऊ शकतात. घटनेच्या अनुषगाने वरिष्ठांना माहिती देऊन अवगत केले जात आहे. तपोवन संस्थेला जिल्हा महिला बालविकास अधिका-यांतर्फे पत्र पाठवण्यात आले असून, या पत्रात संस्था बंद करण्याबाबत उल्लेख आहे.