महाराष्ट्र केसरीचे नगरमध्ये उद्घाटन

0
41
वाढदिवसाच्या शुभेच्छा

अहमदनगर- लाल मातीतील प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरीची उत्सुकता सर्वानाच असते. ५८वी राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा त्याला अपवाद नव्हती. माजी खासदार दिलीप गांधी आणि माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक हिंदकेसरी तसेच पहिलवानांच्या उपस्थितीत गुरुवारी वाडिया पार्कमधील जिल्हा क्रीडा संकुलात यंदाच्या स्पर्धेचे उद्घाटन झाले.
राज्यातील कुस्तीगीर आणि तालीम संघाचे पदाधिकारी तसेच प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीने लक्ष वेधून घेतले तरी उद्घाटन सोहळय़ाला कुस्तीशौकिनांनी गर्दी केली नाही. अहमदनगर जिल्हा तालीम संघ आणि पैलवान छबू लांडगे प्रतिष्ठानच्या (अहमदनगर) संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र केसरीचे आयोजन करण्यात आले आहे.
नगरच्या मल्लांची विजयी सुरुवात
महाराष्ट्र केसरीच्या पहिल्या दिवशी यजमान नगरच्या विकास सासवडे (६५ किलोगट) आणि गोपीचंद लोखंडेने (५७ किलोगट) विजयी सलामी दिली. सोलापूर, पुणे आणि कोल्हापूर जिल्हयांतील मल्लांनी वर्चस्व राखताना तिसरी फेरी गाठली.
वाडिया पार्क क्रीडा संकुलात गुरुवारी सकाळी ८ वाजता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला प्रारंभ झाला़ पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात माती आणि गादी प्रकारातील ५७ आणि ६५ किलो वजनी गटातील लढती रंगल्या़ ६५ किलो गटातील पहिल्या फेरीत कोल्हापूरच्या संघाने वर्चस्व राखल़े ५७ किलो गटात त्यांच्या भरत पाटील व सद्दाम शेख यांनी विजय साजरा केला़ ५७ किलो गटात पुण्याचा तुकाराम शितोळे आणि भंडा-याचा मेकीराम बाडेबुचे यांची लढत रंगतदार ठरली़ मात्र मर्यादित वेळ संपल्यानंतर पंचांनी गुणांच्या आधारे पुण्याच्या शितोळेला विजयी घोषित केल़े पुण्याचा स्वप्नील शेलार आणि अमरावतीचा अब्दुल हाफिज यांच्यातील लढतही गुणांवर गेली़ त्यात शेलारने बाजी मारली.
५७ किलो गटात सोलापूरचा दिनेश जाधव आणि आबासाहेब अटकलेने चीतपट कुस्ती करुन सर्वाची मने जिंकली़ दिनेशने औरंगाबादचा बाळू बागडेला ढाक लावून चीत केल़े तर अटकलेने ठाण्याचा अजय भोईरला अस्मान दाखविल़े याच गटात अहमदनगरचा गोपीचंद लोखंडेने रत्नागिरीच्या प्रथमेश कळवेला चांगलेच लोळविल़े ६५ किलो गटात नगरचा विकास सासवडेने बुलढाण्याचा ज्ञानेश्वर राजपूतला अस्मान दाखविल़े
माती प्रकारातील ६५ किलो वजनी गटात सागर नलावडे (सातारा), आबासाहेब मदने (सोलापूर), धर्मा शिंदे (नाशिक), सद्दाम शेख (औरंगाबाद), दिनेश मोकाशे (पुणे), दिलीप शेवंडे (मुंबई उपनगर), समीर शेखने (हिंगोली) आश्वासक सुरुवात केली. गादी प्रकारातील ६५ किलो वजनी गटात कृष्णा नागले (बीड), जटाप्पा लोणार (सांगली), प्रवीण जाधव (धुळे), संजय पाटील (मुंबई), मोईन शेख (औरंगाबाद), आलिम शेख (लातूर), श्रीराम बारुंगसे (नाशिक), शिवाजी भोसले (सोलापूर), गणेश पावडे (परभणी), प्रणय सुतार (रायगड), रावसाहेब राजगे (मुंबई उपनगर), किसन चव्हाण (गडचिरोली), विलास मणी (कोल्हापूर), सोमनाथ फुलसौंदर (उस्मानाबाद), आकाश नलावडे (कोल्हापूर), सागर लोखंडे (पुणे), वैभव गाडे (अकोला), किरण नलावडे (अहमदनगर), अभिजीत भांगे (पुणे), दिनेश गायकवाड (जळगाव), श्रीधर मुळीक (सातारा), विजय म्हात्रेने (कल्याण) पहिला दिवस गाजवला.
पहिल्या दिवशी मॅटवरील दहा कुस्त्या चितपट
मॅट (गादी) प्रकारात पहिल्या दिवशी दहा कुस्त्या चितपट ठरल्या. ५७ किलो गटात वध्र्याच्या शुभम तडसने ठाण्याचा कृष्णा खराटेला चीत करत स्पर्धेतील पहिली चितपट कुस्ती करण्याचा मान मिळविला़ त्यानंतर जालनाच्या अक्षय धानोरेने बुलढाणाच्या योगेश काकडला ढाक काढून चितपट केल़े परभणीच्या आनंद पावडेने अकोल्याच्या अमित चारीला अस्मान दाखविल़े धुळय़ाचा लखन जावडेकर, हिंगोलीचा शुभम भारद्वाज, रायगडचास्वप्नील लाखनने (रायगड) चितपट कुस्त्या करीत प्रेक्षकांची दाद मिळविली़