नथुराम गोडसे’ विरोधात पुण्यात याचिका दाखल

0
16

पुणे- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नाथुराम गोडसे यांच्या जीवनावर आधारित सिनेमा ‘देशभक्त नथुराम’वर बंदी घालावी, या आशयाची याचिका पुणे कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी अखिल भारतीय हिंदु महासभेच्या विरोधात ही याचिका दाखल केली आहे. सिनेमात नथुराम गोडसे यांना देशभक्त तर महात्मा गांधी यांना हिंदू विरोधी दाखवल्याचे याचिकेत म्हटले आहे.

दरम्यान, या सिनेमात महात्मा गांधी यांना हिंदू विरोधी तर नथुराम गोडसे यांना देशभक्त दाखवण्यात आल्याचे अखिल भारतीय हिंदू महासभाचे महासचिव मुन्नाकुमार शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. यामुळे हा सिनेमा प्रदर्शित झाला तर समाजातील लोकांचा भावना दुखावण्याची शक्यता असल्याचे याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी म्हटले आहे. सिनेमातील आक्षेपार्ह दृश्य आणि संवादाला कात्री लावली जात नाही, तोपर्यंत ‘देशभक्त नथुराम’वर बंदी घालण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.

वकील वा‍झिद खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायाधिश एस.एस. नायर यांच्या कोर्टात शुक्रवार (26 डिसेंबर) याचिकेवर सुनावणी होणार आहे. 30 जानेवारी 2015 ला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. महात्मा गांधी यांची हत्या 30 जानेवारी 1948 रोजी गांधीजींची हत्या झाली होती.