मनोहरभाई पटेल सुवर्णपदक वितरण सोहळा ९ फेब्रुवारीला

0
11

गोंदिया,दि. 2 –: जिल्ह्य़ातील शिक्षणमहर्षी मनोहरभाई पटेल यांच्या १११ व्या जयंतीदिनी ९ फेब्रुवारीला भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील शालांत व पदवी परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांना मनोहरभाई पटेल यांच्या स्मृतीत सुवर्णपदक देऊन गौरविण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद््घाटन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यादव यांच्या हस्ते व माजी केंद्रीयमंत्री तथा खा. प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली होईल.
यावेळी जनता दलाचे राष्ट्रीय प्रवक्ता खा. के.सी.त्यागी, माजी खा. पवन वर्मा, भारतीय फुटबॉल संघाचे माजी कॅप्टन बाईचुंग भुटिया, भारतीय फुटबॉल संघाचे विद्यमान कॅप्टन सुनील छेत्री, माजी मंत्री अनिल देशमुख,आ. गोपालदास अग्रवाल, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, विलास श्रृंगारपवार, नाना पंचबुद्धे, माजी आ. अनिल बावनकर, रामरतन राऊत, दिलीप बनसोड, सेवक वाघाये, मनोहरभाई पटेल आकदमीच्या अध्यक्ष वर्षाताई पटेल, माजी आ. मधुकर कुकडे, विजय शिवणकर, नरेश माहेश्‍वरी आदी उपस्थित राहणार आहेत.
मनोहरभाई पटेल अकादमी व गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव माजी आ. राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात समारोहाची जय्यत तयारी सुरू आहे.
या समारोहाला मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मनोहरभाई पटेल स्मृती समिती, श्री गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळ, मनोहरभाई पटेल अकादमी, गोंदिया शिक्षण संस्थेतर्फे माजी आ. राजेंद्र जैन यांनी केले आहे.