मुंद्रा इथे कोळी बांधवांसोबत स्वच्छता मोहिम

0
22

मुंद्रा -पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियानङ्क जाहीर केल्यापासून संपूर्ण देश या चळवळीत सहभागी झाला आहे. महात्मा गांधी यांचे ‘स्वच्छ भारताङ्कचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व नागरिक या चळवळीमध्ये सहभागी होत आहेत. अधिकाधिक लोक आणि संस्थां हातात झाडू घेऊन या चळवळीमध्ये सहभागी होत असल्यामुळे त्याला चांगली गती मिळत आहे.

हे काम खूप मोठे आणि ते पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्नांची गरज आहे. त्यातही जास्त अवघड जागा निवडण्याची गरज मोठी आहे. अदाणी फाउंडेशनने नेमके हेच केले. अदाणी फाउंडेशनतर्फे गुजरातमधील कच्छ प्रदेशातील जुने बंदर, मुंद्रा या ठिकाणी नुकतीच स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. जुने बंदर हे मासेमार समाजाचे तात्पुरते राहाण्याचे ठिकाण आहे. मासेमारांची कुटुंबे इथे वर्षातील आठच महिने राहातात. त्यांचे आरोग्या आणि व्यवसायासाठी स्वच्छ आणि निरोगी वातावरण असणे अतिशय महत्त्वाचे आहे, मात्र ते पुरवणे तितकेच आव्हानात्मक आहे.

अदाणी फाउंडेशनने हे आव्हानात्मक काम हाती घेतले आणि डिसेंबर महिन्यात तेथे स्वच्छता मोहिम राबवली. अदाणी फाउंडेशनचे कर्मचारी, अदाणी विद्यामंजिर व एडीएव्ही शाळेचे विद्यार्थी (अदाणी फाउंडेशनतर्फे चालवल्या जाणाऱ्या) आणि कोळी समाजातील सदस्या या स्वच्छता मोहिमेत मनापासून सहभागी झाले होते. पांढरे टी-शर्ट, मास्क, टोप्या, झाडू आणि तीव्र इच्छाशक्तीमुळे या मोहिमेचे वातावरण अतिशय उत्साहवर्धक होते. डॉ. प्रीती अदानी, व्यवस्थापकीय विश्वस्त, अदाणी फाउंडेशन, श्री. रक्षित शहा, कार्यकारी संचालक (कॉर्पोरेट सर्व्हिसेस, मुंद्रा) आमि श्री. मुकेश सक्सेना, असोसिएट उपाध्यक्ष (एपीएसईझेड) यांनी या मोहिमेदरम्यान सर्व सहभागींना प्रेरित करण्यासाठी आवर्जून हजेरी लावली.

अदाणी फाउंडेशनने आयोजित केलेली ही स्वच्छता मोहिम सर्वव्यापी आणि घर किंवा ऑफिस कोठेही असताना स्वच्छ व निरोगी जीवनशैलीचा पुरस्कार करणारी होती. या मोहिमेचे नाविन्य म्हणजे, मोहिमेच्या दिवशी काही उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.