27.9 C
Gondiā
Thursday, June 25, 2026
Home Featured News शिवाजी महाराज जयंती उत्साहात

शिवाजी महाराज जयंती उत्साहात

0
26

गोंदिया दि. 20: श्री शिव छत्रपती मराठा समाज गोंदियाच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी येथील प्रस्तावित शिव छत्रपती प्रतिमा स्थळावर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती समारोह उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जयंतीनिमित्त शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे औक्षण, पूजन व ध्वजारोहण करण्यात आले. विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अशोक इंगळे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार नानाभाऊ पटोले, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, सई अभिमन्यू काळे, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील, माजी आमदार हेमंत पटले, दामोदर अग्रवाल, शिक्षण सभापती भावना कदम, नगरसेवक सतीश देशमुख, कुंदा पंचबुद्धे, विमल मानकर, हेमलता पतेह, मुरलीधर माहोरे, अँड़ बढे, पोलीस निरीक्षक दिनेश शुक्ला, माया सणस, रजनी सावंत प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन श्रुती केकत व सीमा बढे यांनी केले तर आभार सचिव दीपक कदम यांनी मानले. कार्यक्रमाला मराठा समाज व शहरातील नागरिकांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.