पोलीस विभाग व हॉटेल मालकांची बैठक

0
15

गोंदिया दि. 20:: राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ शेजारील सर्व हॉटेल, ढाबे व इतर दुकान यांचे चालक व मालक यांची फुटाळा/सौंदड येथे पोलीस विभागाने बैठक घेऊन अपघात टाळण्यासाठी ग्राहकांची वाहने रस्त्यावर उभी न करू देण्याबद्दल सर्वांना सूचना देण्यात आल्या.राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर मोठय़ा प्रमाणात हॉटेल, ढाबे, इतर दुकान आहेत. या दुकानांमध्ये येणारे ग्राहक आपले वाहन रस्त्यांवर उभे ठेवत असल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा पोलीस विभागाने दुकान चालक व मालकांची बैठक घेऊन सर्वांनी पार्किंगसाठी रोजंदारीवर नोकराची नेमणूक करावी अशी सूचना दिली. असे न केल्यास वाहन चालकासोबत आपणावरही कायदेशीर करवाई करण्यात येईल. अशी तंबी हॉटेल व ढाबाचालकांना दिली. बैठकीला डुग्गीपार पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक केशव वाबळे, डुग्गीपार पोलीस स्टेशनचे कर्मचारी, पोलीस पाटील व फुटाळा गावातील हॉटेल चालक व मालक उपस्थित होते.