व्यसने सोडा मानसे जोडा, व्यसन विनाशाचे प्रतिक

0
19

अमरावती दि.20: देशातील पाचव्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचा शुभारंभ व्यसनमुक्तीचे संदेश असलेल्या दिंडी व रॅलीने झाला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी या रॅलीला हिरवी झेंडी दाखविली.यावेळी राष्ट्रीय प्रबोधनकार, सप्त खंजेरीवादक सत्यपाल महाराज, उद्योग राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त दीपक वडकुते, सहाय्यक आयुक्त प्राजक्ता इंगळे, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण, जनसंपर्क अधिकारी मंगला देशमुख, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. काळे, डॉ. गणेश बुब यांचेसह शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी, ओम शांती ओमचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.
रॅलीची सुरुवात नेहरु मैदान येथुन झाली. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगेबाबा यांच्या पुतळयास हारार्पण करण्यात आले. व्यसनमुक्ती साहित्य संमेलनानिमित्त आयोजित दिंडी व रॅलीमध्ये सामाजिक न्याय विभागाचा व्यसनमुक्ती चित्ररथ, येडाई व्यसनमुक्ती केंद्र ता. कळबं जि. उस्मादाबाद येथील चित्ररथ, ओम शांती ओम सदस्यांचा रथ, मुकबधीर विद्यालयांच्या विद्यार्थींनींचे लेझीम पथक, भातकुली तालुक्यातील रामा येथील वारकरी भजनी मंडळी, समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच अन्य शाळेच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.