जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : डॉक्टरांवरील हल्यांचा निषेध

0
10

गोंदिया दि.20: धुळे येथे डॉक्टरांवर हल्ला करून त्यांना गंभीर दुखापत करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी व डॉक्टरांवर झालेल्या हल्यांचा निषेध करीत येथील डॉक्टरांच्या प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांना निवेदन दिले. धुळे येथील मेडीकल कॉलेजमध्ये रूग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना नुकतीच घडली. याशिवाय गोंदियातही काही डॉक्टरांवर हल्ले करण्यात आले आहेत. या घटना उचीत नसून डॉक्टरांवरील हल्ल्यांचा निषेध नोंदवित तसेच दोषींवर कारवाई करण्याची मागणी करीत येथील डॉक्टरांच्या प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांना निवेदन दिले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्टरांची मागणी वरिष्ठांपर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले. तसेच डॉक्टरांवरील हल्ले बर्दाश्त केले जाणार नसून यासाठी पोलीस विभागालाही योग्य ते निर्देश देण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देणाऱ्या प्रतिनिधी मंडळात इंडीयन मेडीकल ओसिएशनच्या अध्य७ डॉ. आभा सोनकिया, सचिव डॉ. लक्ष्मी गुप्ता, वरिष्ठ शल्य चिकीत्सक डॉ. राजेंद्र जैन, महाराष्ट्र स्टेट टिचर्स अशोसिएशनचे डॉ.ठाकरे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट मेडीकल आॅफीसर्स असोसिएशनचे डॉ. चंदू वंजारे, डॉ. टेंभूर्णीकर व अन्य उपस्थित होते.