घनकचरा व्यवस्थापनासाठी महिलांनी पुढे यावे!

0
13

गोंदिया,दि.२३: शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिगारे लागले असून त्यामुळे दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या घरातील कचरा उघड्यावर टाकून नये. तसेच शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी आता महिलांनी पुढे यावे, असे आवाहन सई अभिमन्यू काळे यांनी केले. सहयोग महिला ग्रुप व सावी महिला फाऊंडेशनच्यावतीने रविवारी (दि.१९) जागतिक महिला दिवस व सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त आयोजित ‘मी सावित्रीबाई बोलतेय’ या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मृदूला अनंत वालस्कर, शिक्षण सभापती भावना कदम, अलका अशोक इंगळे, छबू इंगळे, डॉ. स्वर्णलता हुबेकर, सहयोग महिला ग्रुपच्या संयोजीका योजना कोतवाल उपस्थित होत्या.
कार्यक्रमात सिने कलावंत अपुर्वा सोनार यांनी ‘मी सावित्रीबाई बोलतेय’ हे नाटक सादर केले. तर त्यानंतर सई काळे यांनी उपस्थित सर्व महिलांना कचरामुक्तीसाठी शपथ दिली. तसेच वयोवृद्ध महिलांचा सत्कार करीत महिलांचे विविध कार्यक्रम व स्पर्धा घेण्यात आल्या. प्रास्तावीक कोतवाल यांनी मांडले. संचालन विमल असाटी यांनी केले. कार्यक्रमासाठी सविता तुरकर, सिमा बढे, प्रमोदिनी राऊत, छाया मेश्राम, लुकेश्वरी तुरकर, अंजली ठाकूर, उर्मिला रहांगडाले, शिवांगी कायंदे, रेखा घुसे, उमा महाजन, शितल रहांगडाले, सविता कोतवाल, उर्मिला पारधी, वंदना घाटे, मेघा हाडोळे, श्रृती केकत, मंजुषा कारलेकर, नर्मदा गिरी, अर्जना गौतम, पद्मा कतकवार, प्रतिभा बिसेन, वंदना काळे, लता बाजपेई, सिमा डोये आदिंनी सहकार्य केले.