५८ वर्षीय वृद्धाचा लग्नाचा सेल्फी व्हायरल!

0
15

ठाणे : नव्या वर्षात शुभेच्छांशिवाय आणखी काही व्हायरल झालं असेल तर तो आहे एका ५८ वर्षीय वृद्धाचा लग्नाचा सेल्फी…

५८ वर्षीय या वृद्धाचं नाव आहे सतीश आपटे… ठाण्यात राहणारे आपटे पत्रकार म्हणून ओळखले जातात. आपटे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बोहल्यावर चढलेत… त्यांनी लीजा या २० वर्षीय तरुणीशी लग्न केलंय.

१ जानेवरा २०१५ रोजी वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या लग्नाचा त्यांचा सेल्फी सोशल मीडियावर भलताच व्हायरल झालाय. हे लग्न खास असल्याचं सतीश आपटे यांनी म्हटलंय…