व्यसनमुक्तीच्या प्रचारासाठी शिक्षकाची सायकलवारी

0
10

गोंदिया- आजची तरुण पिढी पाश्चत्य संस्कृतीचे अनुकरण करीत व्यसनाच्या आहारी जात आहे. तरुणाच्या वाढत्या व्यसनाधीनामुळे देशाचे भवितव्य अंधकारमय होत चालल्याने व्यसनमुक्ती च्या प्रसारासाठी कर्नाटक राज्यातील चिक्का तिरुपती, बंगरुळू येथील अमनदीप खालसा याने चक्क सायकलीने भारत भ्रमणाला सुरुवात केली आहे. गेल्या सात वर्षात १ लाख ९५ हजार किलोमीटर भ्रमंती करून आज शुक्रवार ला गोंदियात त्यांचे आगमन झाले.गोंदियात आगमन झाल्यानंतर येथील रेलटोलीस्थित गुरुद्वारा येथे विश्रांती घेतली.
कर्नाटक राज्यातील बंगळुर येथील महादेव रेड्डी उर्फ अमनदीप खालसा यानी आपण घरातील विरोधाला डावलून गुरुनानक मिशन मधील गुरुद्वारा या खाजगी शाळेतील शिक्षकी पेशा सोडून व्यसनमुक्ती आणि धर्माच्या प्रचारासाठी १ जानेवारी २००८ पासून भारत भ्रमंतीला सुरुवात केली. सात वर्षाच्या काळात अमनदीपसिंग खालसा यांनी १ लाख ९५ हजार किलोमीटरचा प्रवास २०१४ डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण केल्याचे सांगितले. देशातील २५ राज्यातील २६ हजार शाळा,महाविद्यालयामध्ये व्यसनमुक्ती विषयी त्यांनी जनजागृती केली. व्यसनाचे दुष्परिणाम, त्यापासून होणारे आजार यांची माहिती ते विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवत आहेत. हे कार्य करतांना कोणताही स्वार्थ किंवा मोबदल्याची अपेक्षा करीत नाही.
अमेरिका येथील जॉन विल्सन यांचा १ लाख २५ हजार किलोमीटरचा सायकल भ्रमंतीचा रेकार्ड अमनदीप ने तोडला असून त्याची दखल गिनीज बुक ऑफ वल्र्ड रेकार्ड ने घेत बुकात नाव नोंदविला आहे. अमनदीप यांच्या कुटुंबात पत्नी,मुलगा,मुलगी असे अपत्य असून मुलगा अमेरिकेत डॉक्टर असून मुलगी शिक्षण घेत होती मधल्या काळात १५ जून २०११ ला मुलीचे लग्न ठरलं असल्याची मिळाली मात्र तेव्हा त्यांनी आपले ध्येय पूर्ण झाल्याशिवाय घरी येणार नसल्याचे सांगत मुलीच्या लग्नसमारंभालाही हजेरी लावली नाही.