मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टिम एकलव्य पीपल्स चाॅईस अवार्डने सन्मानित!

0
10

मुंबई,दि.02-राज्यातील महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी, शाश्वत विकासासाठी तरुण वर्गाची कल्पकता व ऊर्जा यांचा पुरेपूर वापर करण्यासाठी ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या कामकाजात लोकसहभाग वाढवण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला. या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील ११ मुख्य समस्यांवर उपाय करण्यासाठी युवावर्गांनी आपले मत मांडले. या स्पर्धत एकलव्य टिम ने ग्रामीण शिक्षण या विभागामध्ये भाग घेऊन गाव तिथे ग्रंथालय ही संकल्पना सादर केली होती. या राज्यस्तरीय स्पर्धेत ७९७० मत घेवुन एकलव्य टिम ने पहिला क्रमांक मिळविला आहे. १ मे रोजी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात एकलव्यला ५०,००० रु पारितोषिक आणि प्रशस्तीपत्रक मुख्यमंत्री देेवेद्र फडणवीस यांच्या हस्ते मिळाले आहे.

राज्यातील विकासाविषयी युवकांचे मत नेमके काय आहे हे जाणून घेणे महत्वाचे वाटते. या उपक्रमादवारे युवकांच्या विचारांना प्रत्यक्षात आणण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळावा म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र हा कार्यक्रम सुरु केला आहे.या स्पर्धत एकुण २५०० टिम होत्या. त्यापैकी एकलव्य टिमला सर्वाधिक मत पडली. टिम एकलव्य चा गाव तेथे ग्रंथालय हा उद्देश आहे. महाराष्ट्रभरातुन ५०० युवक या चळवळीशी जोडले आहेत, गाव तिथे ग्रंथालय ही संकल्पना ग्रामीण महाराष्ट्रात सर्वदूर पोहचविण्याचा टिम एकलव्यचा मानस आहे.गाव तिथे ग्रंथालय या चळवळीत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन टिम एकलव्यचे राजु केंद्रे यांनी केले आहे.तसेच अधिक माहितीसाठी 7066136634 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.