संपूर्ण पार्थिवाशिवाय अंत्यसंस्कार नाहीत – शहीद जवानाची पत्नी

0
7
चंदिगड, दि. 2 – जोपर्यंत संपूर्ण पार्थिव मिळत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, असे शहीद नायब सुभेदार परमजीत सिंग यांच्या पत्नी म्हणाल्या आहेत. तसेच मला माझ्या पतीचा गर्व आहे आणि मी माझ्या मुलालादेखील सैन्यात दाखल करणार, अशी प्रतिक्रियाही परमजीत सिंग यांच्या पत्नीनं दिली.
 जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमधील मेंढरमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात परमजीत सिंग शहीद झाले. यानंतर पाकिस्ताननं त्यांच्या मृतदेहाची विटंबना करुन अमानुष कृत्य केले.  या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळत आहे. ABP न्यूज दिलेल्या वृत्तानुसार, शहीद जवानाच्या पत्नीनं असे सांगितले की आहे, ‘त्यांना त्यांच्या पतीचे संपूर्ण पार्थिव हवे आहे. त्याशिवाय पतीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार व्हावेत, ही बाब सिंग कुटुंबीयांना न पटणारी आहे’.  पाकिस्तानच्या या हल्ल्यात जवान प्रेम सागरदेखील शहीद झालेत. त्यांच्या मुलीने वडिलांच्या बलिदानाच्या बदल्यात 50 पाकिस्तानी सैनिकांचे शीर कापून आणण्याची मागणी करत आक्रोश व्यक्त केला आहे.