मुलांनी केले आईचे मरणोपरांत नेत्रदान

0
10

भंडारा,दि.09-नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. या दानामुळेच अंधांना जीवनदृष्टी प्राप्त होते. त्यामुळे त्यातून मिळणारा आनंद हा अलौकीक असतो. असेच नेत्रदान गणेशपूर (भंडारा) येथील मनीष वाहाणे व त्यांच्या भावंडांनी केले. विमल दसाराम वाहाणे (६८) यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाल्याने त्यांच्या मुलांनी मरणोपरांत आईचे डोळे दान करून एक सामाजिक बांधिलकी जोपासली.
गणेशपूर भंडारा येथील रहिवासी विमल दसाराम वाहाणे (६८) यांचे सोमवारी सकाळी ८ वाजता ह्रदयविकाराच्या धक्क्य़ाने निधन झाले. समाजाला काही तरी देणे आहे ही भावना लक्षात घेवून त्यांच्या मुलांनी नेत्रदान करण्याचा संकल्प केला. याबाबतीत त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नेत्र विभागाला कळविले व आईचे डोळे दान केले. आईच्या मरणानंतर दु:खाचा डोंगर ओढावलेल्या त्यांच्या मुलांनी समाजहितासाठी घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. हीच आईला दिलेली र्शद्धांजली आहे. विमल वाहाणे यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवारी सकाळी ९ वाजता कारधा येथील वैनगंगा नदीघाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्यापश्‍चात ५ मुले, १ मुलगी, सुना व नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.