स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्क्स फेडरेशनची निदर्शने

0
11

भंडारा,दि.09 : तिन्ही वीज कंपन्यांमधील कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनुभवानुसार व ज्येष्ठतेनुसार नोकरीत कायमरित्या सामावून घ्यावे, या मागणीला घेवून महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्क्स फेडरेशनने सोमवारी राज्यव्यापी धरणे दिले. शहरातील महावितरण कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी निदर्शने करित कंपनीच्या कर्मचारी विरोधी नितीचा विरोध केला.

शासनाच्या अधिकार क्षेत्रातील तिन्ही वीज कंपन्यांमधील (महावितरण, महावीजनिर्मिती व महापारेषण) कंत्राटी स्वरुपात कर्मचारी मागील पाच ते पंधरा वर्षांपासून कार्य करीत आहेत. जवळपास ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना वीज कंपनीने अजूनही कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेतले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार समान काम समान वेतनाच्या धोरणाची अंमलबजावणी तथा सेवा ज्येष्ठता यादी तयार करुन रोजंदारी कामगार योजना लागू करा या मागणीला घेवून वीज कंपनीचे कंत्राटी कामगार मागण्यांची पूर्तता न झाल्यास २२ मे पासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन पुकारणार आहे.

विद्युत भवनाच्या प्रवेशद्वारावर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी निदर्शने व द्वार सभा घेतली. या सभेत वीज कंपनीसोबत मागील चार वर्षांपासून वाटाघाटी सुरु असले तरी त्यापासून कुठलाही तोडगा निघाला नाही. वर्क्स फेडरेशनने १ सप्टेंबर २०१५ ते २८ सप्टेंबर २०१५ असा २८ दिवसांचा संप केला होता. सोमवारी झालेल्या द्वारसभेत फेडरेशनचे तथा कंत्राटी कामगार गणेश तिरपुडे, कैलास जांभुळकर, संदीप बोरपुरे, तुलसीदास कोरे, देवेंद्र कावळे, उमेश आगलावे, डिलेश्वर चोपकर, पवन वैद्य, पगार हटवार, राजकुमार तितीरमारे, नितीन निमजे, टेकराम झोडे, सुनिल डुंभरे, संदीप देशमुख, अमित मेश्राम, सौरभ सांगोळे, आशिष शेंडे, गुरुधर क्षिरसागर, दिपक बोंद्रे, मुकेश कापगते, पंकज लाडेकर, सिमा सीरसाम, विद्या कोचे, माया मडावी, छाया निखाडे, लक्ष्मण नंदनकर, धनंजय ढवळे, तेजू मुंगूलमारे, सुभाष कोल्हारे, आर. एम जांगळे, जागेश्वर डोंगरवार, विजयकुमार वालदे, मनोज पारधी, राकेश टेंभुर्णे आदी उपस्थित होते.