‘ताडोबा’च्या बफर क्षेत्रात प्रगणकांना २७ वाघांचे दर्शन

0
10

चंद्रपूर,दि.12 : बुध्द पौर्णीमेच्या रात्री ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर विभागातील प्रगणनेकरिता १0९ मचानांवरून निरीक्षण करणार्‍या वन्यजीव प्रेमी व क्षेत्रीय कर्मचार्‍यांनी २७ वाघांची नोंद घेतली आहे. वाघांसह वेगवेळया २हजार ७३७ वन्य प्राण्यांची नोंद या उपक्रमाव्दारे घेण्यात आली आहे.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमध्ये येणार्‍या सहा परिक्षेत्रासाठी पाणवटयांवर वन्यप्राणी प्रगणना कार्यक्रम राबविण्यात आला. यासाठी ३ सिमेंट मचान, ८८ लोखंडी मचान व १८ लाकडी मचान अशा एकूण १0९ पाणवट्यांची निवड करण्यात आली होती. या वर्षी प्रगणनेसाठी मोठय़ा संख्येने वन्यजीवप्रेमींनी अर्ज केले होते. त्यापैकी ईश्‍वर चिठ्ठीने वन्यप्रेमींची निवड करण्यात आली होती. २५२ वन्यप्रेमी व कर्मचारी अशा एकूण ३४३ सदस्यांनी या प्रगनणोत भाग घेतला होता. एकूण सहा परिक्षेत्रामध्ये पळसगाव, चंद्रपूर, मूल, शिवणी, खडसंगी, मोहूर्ली या ठिकाणी ही प्रगणना करण्यात आली. यामध्ये चार छाव्यांसह २७ वाघांची नोंद करण्यात आली. याशिवाय बिबट ९, भेडकी ७७, चितळ ४७६, सांबर १८५, चौसिंगा १, निलगाय ८३, रानगवा ३७६, वानर ५१७, अस्वल ७८, रानकुत्रा ४७, कोल्हा ६, रानडुक्कर ७३२, उदमांजर ११, रान मांजर ५, जवादी मांजर ८, सायळ ४, मुंगुस ३३, मोर ३२, ससा २ व इतर ७ प्राण्यांची नोंद करण्यात आली आ