रेल्वेखाली चिरडून नागपूरस्थित दोन भावंडांचा मृत्यू

0
18

गोंदिया दि १२ ; येथील शिवनगर (अंगूरबगीचा)भागातून बालाघाटकडे जाणार्या रेल्वट्रकवर बसलेल्या नागपूरवरुन आलेल्या दोन भावंडाना रेल्वेगाडीने चिरडल्याने मूत्यू झाल्याची घटना गूरुवारला रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत मृत पावलेल्यामध्ये उमेश बिजेवार(23) व अर्जुन बिजेवार या दोन्ही भावांचा समावेश आहे. हे दौघेही भाऊ लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी आले होते. रेल्वेट्रकच्या शेजारीच लग्नसमारंभाचे कार्यक्रम असल्याने रात्री ११ च्या सुमारास दोघेही भाऊ मद्यधुंद अवस्थेत रेल्वे रुळावर जाऊन बसले होते. त्याचवेळी समोरून आलेल्या रेल्वेखाली येऊन दोघांचाही मृत्यू झाला.स्वागत समारंभाचे कार्यक्रम आटोपल्यानंतर दोघेही गोंदिया शहरातील अंगूर बगीचा परिसरातील रेल्वेरुळावर जाऊन बसले होते. त्यावेळी आलेल्या रेल्वेखाली दोघांचाही चिरडून मृत्यू झाला. घटनास्थळाजवळच कार्यक्रम असल्याने काहीतरी घडल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी रेल्वेरुळाकडे धाव घेतली असता प्रकार लक्षात आला.लगेच  सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांना कळविण्यात आली.पोलीसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.तसेच मृतदेह रात्रीच रुग्णालयात हलविले.