पोंभुेर्ल दि.६ : मराठी पत्रकारितेचे जनक आद्यपत्रकार दपर्णकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी पोंभुर्ले येथे आज पार पडलेल्या कायर्क्रमात दर्पण पुरस्काराने गोंदिया सकाळचे जिल्हा प्रतिनिधी सावन डोये यांना सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार महाराष्ट्र पत्रकार कल्याण संघाच्या वतीने जेष्ठ साहित्यिक व विचारवंत सदानंद मोरे यांच्या हस्ते देऊन डोये यांचा गौरव करण्यात आला.शाल,श्रीफळ व रोख पुरस्काराचे स्वरुप होते.याच कायर्क्रमात राज्यातील इतर विभागातील पत्रकारांचा सुधद्ा सत्कार करण्यात आला. कायर्क्रमाला महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.डोये यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष हाजी अल्ताफ शेख,प्रा.एच.एच.पारधी,संजय राऊत,खेमेंद्र कटरे,रवि सपाटे,महेंद्र बिसेन,हिदायत शेख,उदय चक्रधऱ,चंद्रकात बहेकार,आशिष शिंदे,राहुल जोशी,मनोज ताजणे,कपिल केकत,जयंत शुक्ला,दिलीप लिल्हारे,संघपाल गडलिंग आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.