एक रुपयाच्या या नोटेसाठी मोजा सात लाख रुपये

0
9
वाढदिवसाच्या शुभेच्छा

पुणे-सुमारे २० वर्षांपूर्वी भारतीय एक रुपयाच्या नोटांची छपाई बंद झाली आणि आता नवीन वर्षात या नोटा पुन्हा छापल्याही जाणार आहेत. असे असले तरी जुन्या नोटांना आजही किंमत आहेच. सांगायचे म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अशा अनेक नोटा विक्रीसाठी उपलब्ध केल्या गेल्या आहेत. त्यातील एक रुपयाची वैशिष्ट्यपूर्ण नोट सात लाख रुपयांना मिळणार आहे. जुन्या सालातील अनेक नोटा येथे विविध किंमतींना उपलब्ध आहेत.
सात लाखांची ही एक रुपयाची नोट स्वातंत्र्यपूर्व काळातली, ८० वर्षांपूर्वीची आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीची ही एकमेव नोट असल्याचेही सांगितले जात आहे. या नोटेवर तत्कालीन गव्हर्नर जे. डब्ल्यू. केली यांची स्वाक्षरी आहे. ब्रिटीश इंडियाने ती १९३५ साली जारी केली होती. १९४९ सालची नोट सहा हजार रुपयांना आहे. नोटांची काही बंडलेही विक्रीसाठी आहेत. त्यात १९४९, १९५७, १९६४ सालच्या ५९ नोटा ३५ हजारांना आहेत, तर १९५७ चे एक रुपयाचे बंडल १५ हजारांना आहे. १९६८ सालाचे एक रुपयाच्या नोटांचे बंडल ५५०० रुपयांना असून यात शुभ मानल्या जाणार्‍या ७८६ नंबरची नोटही आहे. ही खरेदी ग्राहक घरबसल्या करू शकणार असले तरी त्यासाठी कॅश ऑन डिलिव्हरी पर्याय उपलब्ध नाही.