सुमित्रा महाजन तीन दिवस माहेरी चिपळूणमध्ये

0
12
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली : राजकारणात ‘ताई’याच बिरूदाने प्रसिद्ध असलेल्या लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन ९ ते ११ जानेवारीदरम्यान तीन दिवस चिपळूणमध्ये माहेरी येत आहेत. अध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा कोकणातील हा पहिलाच मुक्काम असेल.

चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्यावतीने शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षात तीन दिवस आयोजित केलेल्या राज्यातील शतायु गंथालये व ग्रंथकार अधिवेशनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते नऊ जानेवारीला होणार आहे. त्यानंतर त्यांचा चिपळÞूण नगरपालिकेच्यावतीने नागरी सत्कार होणार आहे. १० तारखेला त्या त्यांनी आठवी ते अकरावी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या यूनायटेड इंग्लिश स्कूलची पाहणी करणार असून, तेथील शिक्षकांना भेटून बदललेल्या शिक्षण पध्दतीवर त्या चर्चा करणार आहेत.