नागपूरात 11 जूनला राष्ट्रीय ओबीसी महासंघाची दिल्ली अधिवेशनानिमित्त बैठक

0
6

नागपूर,दि.09-राष्ट्रीय ओबीसी महासंघ,ओबीसी कृती समिती व ओबीसीत मोडत असलेल्या सर्व जात संघटनाच्यावतीने येत्या 11 जून रोज रविवारला  धनवटे नॅशनल महाविद्यालय,काँग्रेसनगर नागपूर च्या सभागृहात दुपारी 12 वाजता बैठकिचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकित दिल्ली येथे 7 आॅगस्ट रोजी आयोजित राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या व्दितीय महाधिवेशनाच्या तयारीबाबत आढावा व नियोजन करण्यात येणार आहे.याकरीता विदर्भासह शेजारील मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील सर्व ओबीसी पदाधिकारी,कार्यकर्ते,विद्यार्थी व अधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अधिवेशनाच्या नियोजनासंबधी सहकार्य करण्याचे आवाहन महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ.बबनराव तायवाडे यांनी केले आहे.

या बैठकीत प्रामुख्याने ओबीसी समाजाची जातीनिहाय आकडेवारी जाहिर करुन,ओबीसी समाजासाठी केंद्रात स्वंतत्र मंत्रालय स्थापण करणे.मंडल आयोग,नच्चीपन आयोग व स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करण्यात यावे.ओबीसीना लादलेली असैवंधानिक क्रिमिलेयरची अट रद्द करण्यात यावी.ओबीसीसांठी लोकसभा व विधानसभेत स्वंतंत्र्य मतदारसंघ निर्माण करण्यात यावे.राष्ट्रिय मागासवर्गीय आयोगाला सवैंधानिक दर्जा देण्यात यावा.ओबीसी शेतकर्याना वनहक्क पट्टयासाठी लावलेली तीन पिढंयाची अट रद्द करण्यात यावी आदी मागण्या मंजूर करुन घेण्यासंबधी चर्चा करण्यात येणार आहे.राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दुसरे अधिवेशन 7 आगस्टला सकाळी 11 वाजता कान्स्टिटयुशनल क्लब,रफी मार्ग नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे,त्यावर या बैठकित चर्चा करण्यात येणार असल्याने सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ.बबनराव तायवाडे,राजकीय समन्वयक माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे,सचिन राजूरकर,खेमेंद्र कटरे,शेषराव येलेकर, शरद वानखेडे,अजय तुमसरे,गुणेश्वर आरीकर,प्राचार्य अशोक जिवतोडे,सुषमा भड,मनोज चव्हाण,जिवन लंजे,बबलू कटरे,संजय पन्नासे,कृष्णा देवासे,बबलू कटरे,प्रमोद भांडारकर,संजय माफले,संजय पिदुरकर,गोपाल सेलोकर,विजय तपाडकर,पांडुरंग काकडे,रेखा बारहाते,उज्वला महल्ले,शुभांगी मेश्राम,राजू ख़़डसे आदींनी केले आहे.