नाशिक आणि चंद्रपुरात 2 बिबट्यांचा मृत्यू

0
10

चंद्रपुर- दोन वर्षाचा बिबट्या मृतावस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली आहे. बल्लारपूरच्या मनोरा-उमरी पोद्दार रोडवर हा बिबट्या आढळून आला आहे. बिबट्याच्या अंगावर अपघात झाल्याच्या खुणा आढळून आल्या असून अपघाती मृत्यू झालाची शक्यता वर्तवली जाते आहे.सध्या बिबट्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी नेण्यात आलं आहे. त्यामुळं पोस्टमार्टमच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल की बिबट्याचा अपघाची मृत्यू झाला आहे की बिबट्याला मारण्यात आलं.

नाशिक : नाशिकजवळच्या गंगावाडी रेल्वेब्रीजवर रेल्वेची धडक बसून बिबट्या जागीच ठार झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली. सकाळी नागरीकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर रेल्वे पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
रेल्वे रुळावरुन जात असताना गोदावरीच्या या छोट्या पुलावर रेल्वेट्रॅकवर सापडल्यानं बिबट्या रेल्वेखाली आला असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात बिबट्याचे २ तुकडे झाले. परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या नरमादीची जोडी फिरत होती. त्यातीलच हा नर बिबट्या असावा अंदाज व्यक्त केला जातो आहे. २ वर्षापुर्वीही या ट्रॅकवर अशाच प्रकारे बिबट्याचा अपघाती मृत्यु झाला होता.