आरएसएसच्या कार्यक्रमासाठी महावितरणकडून नियमांचं उल्लंघन

0
16
वाढदिवसाच्या शुभेच्छा

औरंगाबाद : राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर संघाच्या कार्यक्रमावर महावितरण चांगलंच मेहरबान झाल्याचं चित्र औरंगाबादेत पाहायला मिळालं आहे. शहरात झालेल्या संघाच्या कार्यक्रमासाठी महावितरण विभागानं लोडशेडिंगचे सर्व नियम तोडून कार्यक्रमाला वीज पुरवठ केला.
संघाचा औरंगाबादेत देवगिरी प्रांताचा महासंगम आज होतो आहे. या देवगिरी प्रांतात 15 जिल्हे येतात या सर्व जिल्ह्यांमधून जवळपास साठ हजार स्वंयसेवक येणार आहेत आणि या कार्यक्रमात सरसंघ चालक मोहन भागवत ही मार्गदर्शन करणार आहेत.

खर पाहिलं तर कोणत्याही सार्वजनिक अथवा अशा कार्यक्रमासाठी लोडशेडींगचे नियम तोडून वीज पुरवठा करता येत नाही. मात्र संघाच्या कार्यक्रमासाठी महावितरण विभागानं सर्व नियम धाब्यावर बसवल्याचं पाहायला मिळालं. इतकच नाही तर हा वीजेचा भार कमी करण्यासाठी त्यांनी आणखी दोन फीडरवर अतिरिक्त भार दिला आहे.
त्यामुळं भाजपच्या सत्ताकाळात सामान्यांना अजुनही अच्छे दिनची प्रतिक्षा असली तरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी मात्र नक्कीच अच्छे दिन आल्याचं चित्र आहे. त्यामुळं इतरांसाठी नियमांवर बोटं ठेवणाऱ्या महावितरणच्या या भुमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित होतं आहे.