नवी दिल्ली – शेतकऱ्यांना शेतीसाठी वर्षभर पाणी पुरवठा सुनिश्चित व्हावा, यासाठी या महिन्यात ‘पंतप्रधान कृषि सिंचन योजना‘ सुरू करण्याची योजना आहे, अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी सांगितले.
“अटलबिहारी वाजपेयी यांनी ग्राम सडक योजना सुरू केली होती आणि त्याद्वारे प्रत्येक गाव रस्त्याने जोडले गेले आता त्याचप्रमाणे आता आम्ही ‘पंतप्रधान कृषि सिंचन योजना‘ लागू राबविणार आहोत असे राधामोहन सिंह यांनी “पाणी आठवडा‘‘ कार्यक्रमात बोलताना सांगितले. कृषी-सिंचन कार्यक्रम आणि प्रत्येक सिंचन प्रकल्प अंतर्गत संबंधित जिल्हा परिषदेला राज्य सरकारकडून निधी दिला जाईल आणि केंद्र सरकार राज्यांना निधी उपलब्ध करून देणार आहे. जलसंपदा, ग्रामीण विकास आणि त्या संबंधित विविध खात्यांशी चर्चा करून कृषी मंत्रालयाने या विषयावर एक संकल्पना पेपर तयार केला आहे. आता लवकरच या विषयावर पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.
भारतातील 50 टक्के शेती अजूनही पावसावर अवलंबून आहे. एकात्मिक कार्यक्रमाअंतर्गत अनेक वर्षे विविध योजनांवर विविध मंत्रालयांनी निधी उपलब्ध करून दिला परंतु काही राज्यांमध्ये विविध सिंचन प्रकल्पांची अंमलबजावणी योग्य झाली नाही.