डोंगरवारांचा भा.वा.शिंपी गुरुजी भुषण पुरस्काराने ना.मुंडे यांच्याहस्ते सत्कार

0
22
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया-नाशिकच्या कालिदास सभागृहात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे संस्थापक कै. भा.वा.शिंपी गुरुजी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या शिक्षक चेतना मेळाव्याचे उद्घाटन राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण मंत्री ना.पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपक्रमशील शिक्षक, संघटनात्मक भरीव कार्य करणाऱ्या राज्यातील प्राथमिक शिक्षक समितीच्या कार्यकर्त्यांना भा.वा.शिंपी गुरुजी शिक्षक समिती भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.गोंदिया जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे पदाधिकारी व गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष किशोर डोंगरवार यांचा ना.पंकजा मुंडे यांच्याहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी प्राथमिक शिक्षक समितीचे पदाधिकारी व नेते उपस्थित होते.