विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ

0
6

गोंदिया,दि.05ः-जेसीआय.(JCI) क्लब गोंदिया सेंट्रलच्यावतीने येथील श्री राष्ट्रीय शिक्षण संस्थाद्वारे संचालित नुतन विद्यालयात स्वच्छ भारत व निर्मल वातावरण निर्माण करण्यासोबतच देशहितासाठी काम करण्याची शपथ विद्यार्थ्यांसह शिक्षकांना देण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. रा.शि.संस्थेचे सचिव अमृत इंगळे होते.प्रमुख वक्ते म्हणून JCI क्लबचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष पुरुषोत्तम मोदी होते.त्यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केल्यानंतर शपथ दिली.याप्रसंगी नुतन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बी.डी.मार्कन्डॆय,पर्यवेक्षक यादोराव बोरकर,जे.सी.आय.क्लब अध्यक्ष भावना अग्रवाल, पूर्व अंचल अधिकारी वासुदेव रामटेककर, नवनिर्वाचित अध्यक्ष यदावनन्द फरकुंडे, सचिव विनोद चंदवानी, परियोजना निर्देशक धरम खटवानी, सदस्य अरविंद शेंडे जेसीआई गोंदिया सेंट्रलचे सभासद,नुतन विद्यालयाचे शिक्षक व  शिक्षकॆत्तर कर्मचारी उपस्थित होते.संचालन आरएसपीचे अतिरिक्त ज़िला समादेशक सुहर्षचन्द्र ठाकुर यांनी केले,तर आभार  शिक्षक बी.आर.पटले यांनी मानले.