लग्नापुर्वी भगत दांपत्यांनी वृक्षारोपण करून केले श्रमदान 

0
18
पाणी फांउडेशन व घोटा ग्रा.पं.चा उपक्रम
35 शोष खड्यास प्रारंभ
आकाश पडघन
वाशिम दि.०5ः-  जिल्ह्यातील मंगरूळपीर  येथील पाणी प्रश्नाची समस्या निकाली काढण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने (दि.४) फुलचंद भगत व प्रज्ञा तायडे यांनी विवाहापुर्वी  शोषखड्डे खोदण्यासह व वृक्षारोपण करुन श्रमदान केले.पहिल्यांदा बैलगाडीतून भगत दांपत्यांची मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर गावात 35 शोष खड्याच्या कामाला सुरवात करण्यात आली.त्यासाठी पाणी फाऊंडेशन मंगरूळपीर आणि घोटा ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला.
मंगरुलपीर तालुक्यात भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनासोबतच ग्रामस्थांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे.जलसंधारणाच्या कामांना गती व लोकांना प्रेरणा मिळावी याकरीता सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत आणि प्रज्ञा तायडे यांनी विवाह समारंभापूर्वी श्रमदान करण्याचा संकल्प केला होता. यासाठी वाटरकप स्पर्धेमध्ये प्रथमतः सहभागी झालेले घोटा गावचे सरपंच नंदूभाऊ गावंडे यांनी पुढाकार घेतला.पाणी टंचाईवर मात व गाव स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे शोष खड्डा. त्यालाच म्हणतो आपण मॅजिक पिठ हे शोष खड्डे प्रत्येक कुटुंबाच्या घरासमोर व्हावे त्याचा प्रचार प्रसार व्हावा, या हेतुने मंगरूळपीर तालुक्यातील  घोटा गाव शोषखड्डे मुक्त व्हावे या हेतूने पाणी फांउडेशन कडून सुरू असलेल्या सत्यमेव जयते वाॅटर कप अभियान राबविण्यात येत आहे.
         पाणी फांउडेशन कडून राबविण्यात येणा-या सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धेकरीता मंगरूळपीर तालुक्याची निवड करण्यात आली. स्पर्धेच्या दुष्टीने प्रत्येक गाव शोष खड्डे मुक्त होऊन गाव दुष्काळ मुक्त होण्यासाठी हा शोष खड्डयाचा प्रचार प्रसार होण्यासाठी व निसर्गसृष्टीचे महत्व वाढावे याकरीता वृक्षारोपणही करण्यात आले.पाणी फाउडेशन कडून गावागावात शोष खड्डयाची फिल्म दाखविल्या जात आहे. या फिल्मची प्रेरणा घेउन स्पर्धेत सहभागी असलेल्या घोटा गावात शोष खड्डे करण्याचा निर्णय घोटा येथील सरंपच नंदुभाउ गावंडे यांनी घेतला. त्यानुसार घोटा  येथे दि.४रोजी 35 खड्यास प्रारंभ करण्यात आला.प्रथम नवदांपत्याचे सजविलेल्या बैलगाडीतुन वाजतगाजत मिरवणुक काढली व त्यानंतर श्रमदान करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार कुलकर्णी, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठलराव गावंडे, माधुरी चव्हाण,साहित्सीक रंगराज गोस्वामी,नंदुभाऊ गावंडे यांच्या सह पत्रकार  व तालुका समन्वयक प्रफुल बाणगावकर व देवेंद्र राऊत, नाना देवळे , विस्तारक संदीप काळे तालुक्यातील सरपंच,सामाजीक कार्यकर्तेसह गावकर्‍यांची उपस्थिती होती.