स्पर्श जनजागृती अभियान ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी

0
21

गोंदिया,दि.५ : जिल्ह्यात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत स्पर्श कुष्ठरोग अभियान ३० जानेवारी या महात्मा गांधी पुण्यतिथी दिनानिमित्त सुरु करण्यात आले असून ते १३ फेब्रुवारी २०१८ पर्यंत राहणार आहे. ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारीपर्यंत कुष्ठरोग निवारण पंधरवाडा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत कुष्ठमुक्त गाव व कुष्ठबाधिता संबंधित प्रतिज्ञा घेण्यात आल्या आहे. कुष्ठरोगमुक्त जिल्हा व कुष्ठबाधितासोबत भेदभाव होणार नाही याविषयीचे ग्रामसभेमध्ये जिल्हाधिकारी यांच्या घोषणापत्राचे वाचन यादरम्यान करण्यात आले आहे. उपस्थित ग्रामस्थांना आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत कुष्ठरोगाविषयी माहिती देण्यात आली आहे.
कुष्ठरोग निवारण पंधरवाडा मोहिमेचे उदघाटन महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी ३० जानेवारी रोजी करण्यात आले. यावेळी कुष्ठरोगचे सहायक संचालक डॉ.रा.ज.पराडकर यांनी मार्गदर्शन केले. अलर्ट इंडियाचे डॉ.जे.आर.राऊत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुष्ठरोगच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सीमा यादव, एम.एफ.पडोळे, सुनील राठोड, बी.पी.भोकासे, पी.डब्लू.पडोळे व श्री.मुडपीलवार यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार सांख्यिकी सहायक यु.एस.राठोड यांनी मानले.