आचारसंहितेचे पालन करत मालीवाल-मुंदडा परिवाराने ठेवला अनोखा आदर्श

0
17

बीड-औरंगाबाद निवासी संतोषकुमार मुंदडा यांची सुकन्या चि.सौ.का.राधिका तसेच सुभाषचंद्र मालीवाल यांचे सुपुत्र चि.सौरभकुमार यांचा शुभविवाह अतिशय साधेपणाने व अवास्तव खर्चाला फाटा देत तसेच सामाजीक आचारसंहितेचे आदर्श पालन करत संपन्न झाला.

रामप्रसाद राठी, रामेश्वर कासट, तसेच विजयकुमार सोहनी यांनी या कामी पुढाकार घेतला व साखरपुड्यात विवाह संपन्न करण्याचे ठरवले. समाजातील सामाजीक मंडळांनी तसेच जेष्ठ सदस्यांनी दोन्ही परिवाराचे कौतुक करुन या विवाहास पाठिंबा दिला. हे विवाहसंबंध जुळवणे पासुन सोहळा संपन्नतेसाठी औरंगाबाद येथील दिपक तोष्णीवाल, बालाप्रसाद तापडिया, ईश्वर चिचाणी यांचे विशेष योगदान मिळाले. विशेषत: वधु-वर दोघांनीही सामाजीक जाणीवेचे भान ठेवत या विवाहास सहमती दर्शवली वधुचे मामा जयप्रकाश तोष्णीवाल यांनीही तात्काळ होकार दिला. विजयकुमार सोहनी यांच्या निवासस्थानी हा सोहळा आनंदात पार पडला. यावेळी दोन्ही परिवाराचे सदस्य, महेश सेवा संघ, बीड शहर सभा, तालुका सभा, माहेश्वरी प्रगती मंडळ, राजस्थानी महिला मंडळ, जिल्हा माहेश्वरी सभा, आदी मंडळाद्वारे सत्कार करण्यात आला. या विवाह सोहळ्याला सर्व सामाजीक मंडळाचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, सदस्य तसेच प्रतिष्ठीत मान्यवर उपस्थित होते. या विवाह सोहळ्याने माहेश्वरी समाजात अतिशय चांगला पायंडा पडेल व अवास्तव खर्च तसेच वेळेचा अपव्यय वाचला जाईल अशी आशा उपस्थितांकडुन व्यक्त करण्यात येत होती.