शिवसेनेचे मंत्रीही भाजपच्या राज्यमंत्र्यांना अधिकार देत नाहीत – फडणवीस

0
6

नाशिक-राज्यमंत्र्यांना किती अधिकार द्यायचे, याचा निर्णय मंत्री घेत असतात. शिवसेनेचे मंत्री आपल्याला अधिकार देत नाहीत, असे मत भाजपच्या राज्यमंत्र्यांनीही मांडले असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे राज्यमंत्री संजय राठोड यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
महसूलमंत्री एकनाथ खडसे आपल्याला काहीच अधिकार देत नाहीत, असा आरोप करीत संजय राठोड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर फडवणीस म्हणाले, भाजपचे मंत्री आहेत तिथे शिवसेनेचे राज्यमंत्री आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे मंत्री आहेत, तिथे भाजपचे राज्यमंत्री आहेत. राज्यमंत्र्यांना अधिकारांचे वाटप मंत्री करीत असतात. मंत्रिमंडळात अधिकार मंत्र्यांना असतात. त्यापैकी किती राज्यमंत्र्यांना द्यायचे हे तेच ठरवत असतात. माझ्या माहितीप्रमाणे राज्यमंत्र्यांना अधिकार मिळालेले आहेत. भाजपचे राज्यमंत्रीही आपल्याला शिवसेनेच्या मंत्र्यांकडून काहीच अधिकार दिले जात नसल्याचे सांगत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.