ग्रामीणविकास यंत्रणेच्या सनियंत्रण बैठकित अधिकाèयांना धरले खासदाराने धारेवर

0
8

ग्रामीण पाणीपुरवठासह पंचायत विभागाचे अधिकारी झाले अनुत्तरीत
विद्युत विभागाच्या अधिकायाकडे नव्हते पुढचे नियोजन

गोंदिया-केंद्रसरकारच्या विविध विभागामार्फेत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या योजनांची अमलबजावणी करणाèया जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत समितीचे अध्यक्ष खासदार नाना पटोले यांनी अधिकाèयांना चांगलेच धारेवर धरले.केंद्राच्या योजनांच्या नियोजनात आणि त्या योजनांची अमलबजावणी करतांना काही त्रुट्या व निकृष्ट दज्र्याच्या बांधकामाच्या तक्रारी आल्यास सर्वांची केंद्रीय दक्षता समितीकडे तक्रार करुन कुणालाही सोडण्यात येणार नसल्याचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत दिला.
या बैठकिला समितीचे सहअध्यक्ष व गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक नेते,जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी,प्रभारी मुकाअ व जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक जयवंत पाडवी,जिल्हा नियोजन अधिकारी घाटे,उपवनसंरक्षक रामगावकर,समितीचे सदस्य गायत्री चौधरी,जे.‹डी.जगणित,राजेश चतूर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
खासदार पटोले यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेपासून योजनांचा आढावा घेण्यास सुरवात केली.जिल्ह्यातील पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या बांधकामावर सुध्दा नाराजी व्यक्त करीत चांगले रस्ते तयार करण्याचे निर्देश दिले.सोबतच नव्या खेड्याना जोडण्यासाठी नियोजन तयार करण्यासही सांगितले.जिल्हाधिकारी सैनी यांनी गोंदिया जिल्हा महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यात जिल्हा महाराष्ट्रात आघाडीवर असल्याचे सांगतच या योजनेच्या अमलबजावणीसाठी लागणारे उपजिल्हाधिकारी पद रिक्त असल्याचे निर्देशनास आणून दिले.जिल्ह्यात महत्वाच्या योजना राबविण्यात रिक्त पद अडसर ठरत असल्याने ते पद मंजूर करुन दोन्ही खासदार महोदयानी शासनाकडे पाठपुरावा करावी अशी विनंती त्यांना केली.नरेगा योजना ग्रामस्तरावर चागंल्या पध्दतीने राबवून त्याचा लाभ मजुरांना पोचविण्याचे निर्देश देण्यात आले असून या योजनेच्या अमलबजावणीत कुचराई करणाèयावर १ जानेवारीपासून कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.खासदार पटोले व खासदार नेते यांनी मजुरांना काम देण्यासोबतच १०० दिवस काम दिलेल्या मजुरांच्या गावांची संख्या किती अशी विचारणा केली असता पंचायत विभागाचे अधिकारी मात्र उत्तर देऊ शकले नाही. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचा आढावा घेतांना विभागाकडून समाधानकारक माहिती न मिळाल्याने दोन्ही खासदारांनी नाराजी व्यक्त करीत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता शेंडे यांना धारेवर धरत योजनांच्या कामाच्या आलेल्या तक्रारीची दखल घेऊन सोडविण्याचे निर्देश दिले.जनधन योजना,आदिवासींच्या योजना,इंदिरा गांधी श्रावणबाळ योजना,संजय गांधी निराधार योजना आदी योजनांचाही आढावा घेतला.
विज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता फुलकर यांना पुढच्या १५ वर्षाचे नियोजन करण्याचे निर्देश देत ग्रामीण भागातील ९५ ग्रामपंचायतीच्या स्टी्रट लाईटचा प्रश्न मार्गी लावून त्याठिकाणी एलईडी बल्पचा वापर करण्याचा सुचना दिल्या.तसेच ज्या ३१ फिडरवर जिल्ह्यात लोडशेंडीग होत आहे,त्यांची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले.

जिल्ह्यात बँकेच्या नवीन शाखेंचे जाळे पसरविण्याचा ठराव
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील ज्या मोठ्या गावामध्ये बँकेच्या शाखा नाहीत किवा ७ ते १० किलोमीटर अंतरावर कुठेच शाखा नसेल अशा ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा सुरु करण्यासंबधीच्या प्रस्तावाला खासदार नाना पटोले ,खासदार अशोक नेते यांच्या उपस्थितीत मंजुरी देण्यात आली.जिल्हा लीड बँकेच्या व्यवस्थापकांना तसे निर्देश देत एक महिन्याच्या आत गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यात सध्याच्या बँकाची स्थिती काय आहे,कुठे बँकाची गरज आहे याचा आढावा सादर करण्याचे निर्देश खा.पटोले यांनी दिले.त्यांनी राष्ठ्रीयकृत बँकामध्ये सर्वनागरिकांचे जनधनयोजनेंतर्गत खाते शुन्य बँलेसमध्ये उ़घडण्यासंबधी बँकाना निर्देश देण्याच्या सुचना देत बँकात आलेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह सर्वसोयी आणि त्यांना सन्मानजनक वागणूक मिळेल अशा व्यवहार करण्याच्या सुचना दिल्या.