एकाच वेळी ४ हजार १३४ विद्यार्थ्यांनी रेखाटली चित्रे

0
16

चार गटात स्पर्धा : राष्ट्रीय शिक्षण संस्थेचा उपक्रम

गोंदिया : श्री राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सचिव स्व. कमलाकरराव इंगळे यांच्या जयंतीनिमित्त नूतन विद्यालयात जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत जिल्ह्यातील ४ हजार १३४ विद्यार्थ्यानी भाग घेऊन चित्र रेखाटले.
अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष अँण्ड. रामभाऊ डोये, अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, डॉ.उपेंद्र कोटेवार, अशोकराव इंगळे, केशवराव मानकर, माजी खा. खुशाल बोपचे, माजी आ. हेमंत पटले, खोमेश्‍वर रहांगडाले, भेरसिंह नागपुरे, भजनदास वैद्य, विनोद अग्रवाल, कल्पनाताई इंगळे, आशा डोये, भरत क्षत्रीय, अमृत इंगळे, अजय इंगळे, डॉ. हरीश श्रोते उपस्थित होते. ही चित्रकला स्पर्धा चार गटात घेण्यात आली. ‘अ’ गटात प्रथम सृष्टी मेश्राम, द्वितीय अनुष्का पालेवार, तृतीय जोशित चौधरी, प्रोत्साहनपर पुरस्कार गार्गी चौधरी, पुनीत रहांगडाले, नित्या चोरवाही, श्रेया लांजेवार, एकलव्य पटले, ‘ब’ गटात गोंदिया पब्लिक स्कूलची जान्हवी अविनाश सपाटे प्रथम, मृणाली रोकडे द्वितीय, साक्षी भेलावे तृतीय, प्रोत्साहनपर शिवम, उन्नती निकोडे, तोशी दुबे, ईशिका अग्रवाल, शांतनू भेंडारकर, ‘क’ गटात कृष्णा कांबळे प्रथम, धनश्री बागडकर द्वितीय, अमन लाडे तृतीय, प्रोत्साहनपर श्रेयश मेंढे, गौरव अग्रवाल, चित्राशी येडे, कुणाल शहारे, शोभिक कोल्हे तर ‘ड’ गटात कन्हैया आंबाडारे प्रथम, लेखराज चन्हे द्वितीय, वैभव मेश्राम तृतीय, प्रोत्साहनपर प्रीती भवरे, रितू मस्के, ज्योती मोहनकर, योगीता शाहू, कृष्णकुमार डोंगरे यांना देण्यात आला. संचालन एस.झेड. मेश्राम तर आभार भाग्यश्री मार्कंडेय यांनी मानले. नूतन विद्यालयात चित्रकला स्पर्धेत चित्र रंगविताना विद्यार्थी.

<>