परिश्रमाशिवाय यश नाही-आमदार राजेंद्र जैन

0
14

तुमसर : विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात प्रयत्नपूर्वक परिश्रम करुन यश मिळवावे, असे आवाहन गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव आमदार राजेंद्र जैन यांनी केले. एस.एन. मोर महाविद्यालयात आयोजित सप्तरंग- २0१५ कार्यक्रमात ते बोलत होते.
अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक कैलास कणसे होते. अतिथी म्हणून नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, प्राचार्य डॉ. चेतनकुमार मसराम होते.
यावेळी पोलीस अधिक्षक कणसे म्हणाले, स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी चौफेर व चौकस राहावे, उज्वल भवितव्यासाठी प्रयत्न व अभ्यास महत्वाचा असतो. त्यामुळे अभ्यासात अधिक मेहनत घ्यावी असे आवाहनन करुन म्हणाले, विद्यार्थी जीवनात एकाग्रतेला महत्त्व देण्याची गरज आहे. परिश्रम, जिद्द आणि चिकाटीने यश मिळविता येते असे सांगितले. अहवालवाचन विद्यार्थी प्रतिनिधी अंकीता शर्मा, संचालन डॉ. पी.पी. देहलीवाल, डॉ.आर.के.दिपटे, प्रा. आर. के. उबाळे तर आभार डॉ. के.के. लेंडे, प्रा.एस.ए. राठोड यांनी मानले. पारितोषिक वितरण कार्यक्रमाला पोलीस निरिक्षक किशोर गवई, योगेश सिंगनजुडे, कल्याणी भुरे, उपस्थित होते. कार्यक्रमाकरिता डॉ. संजय आगासे, प्रा. रेणुकादास उबाळे, डॉ. एस.पी. पवार, डॉ. के. एन. साठवणे, प्रा. ए.आर. रामटेके, डॉ. जी. जी. बघमार, एम. एफ. जाधव यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.