दत्तक गाव पाथरीचा विकास आराखडा झाला तयार

0
33

गोरेगाव-खासदार व माजी केंंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी पाथरी गावाला दत्तक घेतले. खासदारांनी गावाचा विकास आराखडा तयार केला. या गावात कोणती कामे होणार यांचा समावेश त्या आराखड्यात आहे.

जि.प. उच्च प्राथमिक शाळेला आवार भिंत व स्वच्छ सुलभ शौचालय, बसस्थानक येथे शौचालय बांधकाम, भुताईटोला येथे हनुमान चौकात शौचालय बांधकाम, स्मशान घाटावर बर्निंग शेड, सभामंडप, पानघाट, भुताईटोला बोडी खोलीकरण, पाथरी बांधतलावाचे खोलीकरण, पाथरी गावातलावाचे खोलीकरण व धोबीघाट बांधकाम, जि.प. उच्च प्राथमिक शाळा पाथरी येथे कम्प्युटर ई लर्निंग सेवा, पाथरी येथील २८ पिण्याच्या पाण्याच्या विहिराचे तोडींचे बांधकाम, भुताईटोला येथे १८ विधंन विहिरीचे गटारे व खड्डे बांधकाम, हिरामन बडगाये ते कुवरलाल भोयर यांच्या शेतापर्यंत पांदण रस्ता बांधकाम, स्व. उपचंद पटले ते परसराम परतेती यांच्या शेतापर्यंत पांदण रस्ता बांधकाम, बबु कुरैशी ते गफारभाई शेख यांच्या शेतापर्यंत पांदणरस्ता बांधकाम होणार आहेत. सर्व बांधकामाचे भूमिपूजन १७ फेब्रुवारी २०१५ ला दुपारी १२.४० पासून भूमिपूजन होणार आहे. सर्व कामे पुर्ण झाल्यावर किंवा वेळेवर येणारे अधिक विकास कामांना मंजूरी पुन्हा मिळणार असल्याची माहिती आयोजक केवलराम बघेले, सरपंच आशा खांडवाये व ग्रामसेवक सी.ए. रहांगडाले यांनी दिले.
या कामांच्या बरोबरच केवलराम बघेले यांच्याकडून पाथरी शाळेच्या इयत्ता १ ते ७ वी पर्यंतच्या सर्व १५० विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले.गावातील ६५ वय पुर्ण झालेल्या जेष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ देऊन नागरी सत्कार करण्यात येईल. यात ६५ वर्ष वय ओलांडलेल्या एकून पाथरी भुताईटोला येथील २०० पुरुष-स्त्री सन्मानित होतील.

गावकऱ्यांना आपल्याच गावात सर्व सुविधा मिळण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शनी, पशुचिकित्सा शिबिर, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, माझे गाव स्वच्छ गाव मोहीम, बचतगट मेळावा, हळदी कुंकु कार्यक्रम, लोकजन जागृती अभियांनातर्गत श्रावणबाळ योजना, संजयगांधी निराधार योजना, मोफत शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. रंगमंचाचे लोकार्पण तायक्वांडो स्पर्धा, पॅन कार्ड बनविण्याचे कॅम्प, अंधश्रद्धा निर्मुलन कार्यक्रम व स्वच्छ भारत मिशन शासनाच्या विविध योजना-मार्गदर्शक तज्ञाकडून मार्गदर्शन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन गावातील सर्व स्तरातील ग्रामस्थांना माहिती देण्यात येईल.

गावाच्या विकासाबरोबरच गावकऱ्यांचा बौधिक मानसिक, आर्थिक व शैक्षणिक विकास साधण्यांचा प्रयत्न केला जाणार आहे. पाथरी पिण्याचे पाणी व शेतीला जलसिंचन करण्यात येईल अशी बहुउद्देशिय योजना पाथरी गावात अंमलात येणार आहे.