अग्रवालांच्या हॅट्रीकने काँग्रेसला जीवदान

0
10
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया : गोंदिया मतदार संघात जिल्हा मुख्यालय असल्यामुळे येथील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गेल्या १० वर्षांपासून येथे काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल आमदार होते.त्यांनी यावेळी आपली शेवटची निवडणूक आणि मतदार संघाचा पुन्हा विकास करायचाय, म्हणत निवडणुकीत उतरले. आमदार अग्रवालांवर त्यांच्या विरोधात लढत असलेल्या प्रत्येक उमेदवाराने चिखलफेक केली. परंतु, येथील जनतेने त्यांच्या विकासाच्या संकल्पनेला साथ दिली. गोपालदास अग्रवाल यांनी ६२२८५ मते घेऊन विजयश्री मिळविला. पहिल्या फेरीपासून अग्रवाल समोर होते. भारतीय जनता पक्ष येथे कित्येक वर्षानंतर पहिल्यांदाच भा१⁄२य अजमावत असल्यामुळे कार्यकत्र्यांत नवचैतन्य आले. भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनोद अग्रवाल यांच्या प्रचारार्थ येथे सभा घेतली. जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल निवडणूक लढत असल्यामुळे भाजपचा विजय निश्चित असल्याचे भाकीत अनेकांनी वर्तविले. परंतु, नरेंद्र मोदी यांची हवा चालली नाही. विनोद अग्रवाल यांना ५१६२० .मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसèया क्रमांकाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा हा गृहजिल्हा आहे. परंतु. त्यांच्या पक्षाचे उमेदवार अशोक गुप्ता यांना ३३००० मतांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने अल्पसंख्यांक समाजाला तिकीट दिल्यामुळे कुणबी आणि पोवार समाजाची गठ्ठा मते ओबीसी वर्गातील शिवसेनेचे राजकुमार कुथे यांना मिळतील, असे समीकरण होते. परंतु, कुथे यांना २०७८८ मते घेऊन चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. बसपचे योगेश बन्सोड यांना १५६५४ एवढी मते मिळाली ते पाचव्या क्रमांकावर राहिले. कसल्याही लाटेला न जुमानता येथील मतदारांनी विकासाला साथ दिल्याचे निकालावरून दिसून येते.