शासन प्रशासनात समन्वयाची भूमिका महत्वाची-आ.पुराम

0
7

सालेकसा,दि.31ः- शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य लोकांपर्यत पोहोचविण्यासाठी तसेच त्यांचा प्रत्यक्ष लाभ शेवटच्या घटकापर्यत मिळवून देण्यासाठी प्रशासनाने अधिकारी आणि कर्मचारी यांची भूमिका महत्त्वाची असते. अशात शासन आणि प्रशासनातील समन्वय साधून काम केल्यास सर्वांगिण विकास साधण्याचा मार्ग सुकर झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन आमदार संजय पुराम यांनी केले.
तालुका प्रशासनाच्या वतीने येथील तहसील कार्यालयाच्या मैदानात आयोजित सुवर्ण जयंती महाराजस्व अभियानातंर्गत विस्तारीत स्वरूपात आयोजित समाधान शिबिरात अध्यक्ष स्थनावरून ते बोलत होते. उद््घाटन उपजिल्हाधिकारी अशोक लटारे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सभापती लता दोनोडे, जि.प.सदस्य दुर्गा तिराले, पं.स.सभापती अर्चना राऊत, उपसभापती दिलीप वाघमारे, नगराध्यक्ष वीरेंद्र ऊईके, उपाध्यक्ष प्रल्हाद वाढई, न.प.बांधकाम सभापती उमेदलाल जैतवार, माजी प.स.सभापती बाबुलाल उपराडे, मराग्राहयो अध्यक्ष खेमराज लिल्हारे व इतर मान्यवर उपस्थित होते.
आमदार पुराम म्हणाले, शासनाच्या योजनांचा लाभ देताना त्यातील अनेक निकषांची पुतर्ता करावी लागते. मात्र, अडवणींवर मात करण्यासाठी अधिकारी आणि पदाधिकारी यांनी एकत्रित बसून समस्येवर तोडगा काढावा लागतो. शासनाच्या योजना सर्व सामान्य घटकांना देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जर शासन प्रशासनातील समन्वय राहणार नाही तर कितीही लोकोपयोगी योजना असल्या तरी शेवटच्या घटकापयर्ंत त्याचा लाभ पोहोचणार नाही. अशात प्रत्येकांनी आपल्या कर्तव्याचे इमानदारीने पालन केले पाहिजे, असे सांगितले.
याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी लटारे व इतर मान्यवरांनी ही समयोचित मार्गदर्शन केले. महासमाधान शिबराचे औचित्य साधून याप्रसंगी वर्ग दोनची जमीन वर्ग एक केल्याचे सातबारा वाटप, गरजूंना जमिनीचे पट्टे वाटप, तसेच वन विभागाकडून ७५ टक्के अनुदानावर गूस कनेक्शन वाटप, मानव विकासातंर्गत धनादेश वाटप व इतर योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला. प्रास्ताविक तहसीलदार साहेबराव राठोड यांनी मांडले. आभार नायब तहसीलदार भुरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी तहसील कार्यालयातील कर्मचारी, पटवारी व इतर विभागातील कर्मचार्‍यांनी सहकार्य केले