राज्यातही आता कागदपत्रांच्या सेल्फ अटेस्टेड प्रती, राज्य सरकारचा जीआर लागू

0
17

मुंबई : महाविद्यालयांच्या प्रवेशापासून अनेक सरकारी कामांपर्यंत अनेक ठिकाणी कागदपत्रांचं अटेस्टेशन (ट्रू कॉपी) करण्यासाठी करावी लागणारी धावपळ आता टळणार आहे. कारण सेल्फ अटेस्टेड म्हणजेच संबंधित व्यक्तीच्याच स्वाक्षरीनेच आता काम होणार आहे.

डॉक्टर, वकील, बँक अधिकाऱ्यांसारख्या विशेष कार्यकारी अधिकारी किंवा राजपत्रित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेल्या प्रती सादर करणे आतापर्यंत अनिवार्य होते. नागरिकांना होणारी असुविधा टाळण्यासाठी शासकीय कार्यालयामध्ये शपथपत्र, प्रमाणपत्र किंवा साक्षांकित प्रती म्हणजेच अटेस्टेशनऐवजी स्वयंसाक्षांकित प्रती अर्थात सेल्फ अटेस्टेड प्रती सादर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या सर्व शासकीय कार्यालयं, स्थानिक स्वराज्य अशा शासकीय संस्थांमध्ये सादर करावे लागणारे अॅफिडेविट तसंच मूळ कागदपत्रं किंवा प्रमाणपत्रं सेल्फ अटेस्ट करणं शक्य होणार आहे. प्रचलित कार्यपद्धत अधिक सुलभ करण्यासाठी शासनाने हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.